जुन्या वादाच्या कारणावरून खुन करणा-या आरोपीनां कोंढवा तपास पथकाने १ तासात ठोकल्या बेड्या

0
Spread the love

.सह संपादक- रणजित मस्के

पुणे ;दि.२७/०१/२०२५ रोजी कोंढव्यातील भैरवनाथ मंदिरासमोरील दशक्रिया विधी धाम येथे एक इसम जखमी अवस्थेत पडलेला आहे. असा कॉल प्राप्त झाल्याने घटनास्थळवर पोलीसांनी भेट दिली असता सदर इसम याच्या डोक्यावर व तोंडावर कोणत्या तरी हत्याराने किंवा वस्तुने मारहाण करुन त्याचा खुन केल्याचे लक्षात आले त्याप्रमाणे कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं ७१/२५ नारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१),३ (५) प्रमाणे अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळावर भेट देवून व घटनेचे गांभीर्य पहाता आरोपी यांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे वपोनि श्री. विनय पाटणकर, पोनि गुन्हे श्री. अब्दुल रौफ शेख यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे बोउपनि बालाजी डिंगोळे व त्यांचे तपास पथक अज्ञात आरोपी यांचा शोध घेत होते. घटनास्थळावरील लोकांना मयत इसमांबाबत विचारणा करता त्याचे नाव मल्लेश कुमेद्र कोळी, वय २२ वर्षे, रा. गल्ली नं १, आंबेडकर वसाहत, कात्रज कोंढवा रोड, आर के कॉलनी शेजारी, कात्रज, पुणे अशी प्रथमदर्शनी माहिती मिळाली वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे तपासपथकाने तपास चालू केला असता तपास पथकातील पोलीस अंमलदार विशाल मेमाणे व सुजित मदन यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की नयत इसमांबरोबर घटनेच्या काही वेळा पुर्वी कोण दारू पिण्यास होते व कोणाचे वाद झाले म्हणुन त्या माहितीच्या आधारे तपास पथकातील स्टाफच्या मदतीने संशयीत इसम १) बारीश उर्फ बाऱ्या संजय खुडे २) आकाश सुभाष मानकर यांना गुन्हा करून पळून जाण्याव्या तयारीत असताना टिळेकरनगर, पाण्याच्या टाकीजवळुन ताब्यात घेतले.त्यांच्याकडे चौकशी दरम्यान मयत इसम व आरोपी १) बारीश उर्फ बा-या संजय खुडे, वय २१ वर्षे रा. भैरवनाथ मंदिराजवळ, तालीम चौक, कोंढवा खुर्द पुणे २) आकाश सुभाष मानकर, वय २३ वर्षे रा. आर के कॉलनी, गोकुळनगर पुणे यातील आरोपी क्र २ आकाश मानकर याची बायकोवर वाईट नजर टाकण्याच्या संशयावरून मयताचे व आरोपीचे वाद झाले होते, आरोपी आकाश मानकर व त्याचा मेव्हुणा आरोपी बारीश खुडे यांनी अशी माहिती दिली.त्यामुळे दि.२७/०१/२०२५ रोजी घटनास्थळी दारू पित असताना त्यांना मयत इसम मल्लेश कुपेद्रं कोळी येताना दिसला म्हणुन त्यांनी त्याला आरोपी १) बारीश उर्फ बाऱ्या संजय खुडे, वय २१ वर्षे रा. भैखनाथ मंदिराजवळ, तालीम चौक, कोंढवा खुर्द पुणे २) आकाश सुभाष मानकर, वय २३ वर्षे रा. आर के कॉलनी, गोकुळनगर पुणे यांनी त्याला घटनास्थळावरील झाडाच्या फांदी व तेथील सिमेंट ब्लॉकच्या मदतीने मारहाण करून जिवे तार केले असल्याची कबुली दिली. सदर गुन्ह्यामध्ये कोणताही सुगावा नसतानापोलीसांनी तांत्रिक कौशल्य तसेच अथक मेहनीतीने परिश्रम करून आरोपीतांना एका तासाच्या आत जेरबंद केले. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे हे करित आहेत.सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५, पुणे डॉ, राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे श्री. धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अब्दुल रौफ शेख, यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेगाणे, गोरखनाथ चिनके, शाहिद शेख, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, सुरज शुक्ला, सुजित मदन, सागर भोसले यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट