जुनाराजवाडा पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी चोरी करणा-या ३ चोरट्यांना ठोकल्या बेड्या..

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

कोल्हापूर ;

२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस केले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कामगीरी.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घरफोडीचे गुन्हे घडत असलेने त्यास आळा घालणेकरिता व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित साो, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेचे दृष्टीने योग्य ते मार्गदर्शन करुन तपासाबाबत सुचना दिल्या होत्या.

मा. पोलीस अधीक्षक साो, यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक, श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे तपास पथक तयार करुन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेच्या अनुषंगाने प्रयत्न करीत असताना पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी राज मलीक व त्याचे साथीदार यांनी घरफोडी केली असून तो व त्याचे साथीदार चोरीतील दागीने विक्री करिता आज रोजी निर्माण चौक कोल्हापूर येथे येणार आहेत. अशी खात्रीशिर बातमी मिळालेने तपास पथकाने आज रोजी निर्माण चौक, कोल्हापूर येथे साध्या वेषात सापळा लावून १] राजकुमार वासीम मलीक, वय २९ वर्षे, रा. अष्टविनायक चौक, राजारामपूरी, कोल्हापूर २] विपुल वासीम मलीक, वय २६ वर्षे, रा. तामगाव रोड, जाधव कॉलनी, उजळाईवाडी, ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर ३] आदित्य भिमराव दिंडे, वय २३ वर्षे, रा.नवशा मारूती मंदिर जवळ, दत्त गल्ली, राजारामपूरी, कोल्हापूर यांना पकडून त्यांचे कब्जातून एकूण २,०२,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागीने, रोख रक्कम, गॅस टाकी, मोबाईल व ज्युपीटर मोपेड गाडी असा मुद्देमाल कायदेशिर प्रक्रीया करून जप्त केला आहे. सदरबाबत माहिती घेतली असता आरोपीत यांनी जुनाराजवाडा पोलीस ठाणे गु.र.नं. ९९/२०२५ भा.न्या.सं.क. ३०५, ३३१ [३] [४] तसेच गु.र.नं. ६७६/२०२४ भा.न्या.सं.क. ३०५ [अ], ३३१ [३] [४] असे ०२ गुन्हे उघडकीस आणले आहे. नमुद आरोपीत यांना जप्त केले मुद्देमालासह पुढील कारवाई करीता जुनाराजवाडा पोलीस ठाणे येथे हजर केले असुन पुढील तपास जुनाराजवाडा पोलीस ठाणेकरवी सुरु आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित साो, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस अमंलदार वैभव पाटील, गजानन गुरव, प्रदिप पाटील, प्रविण पाटील, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, संतोष बरगे, परशुराम गुजरे, योगेश गोसावी, अरविंद पाटील, शिवानंद मठपती व राजेश राठोड यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट