जुगार अड्डयावर छापा घालुन ३,०८,९४० रुपयांच्या मुद्देमालासह ७ लोकांवर सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. समीर शेख सो, यांची अवैध धंद्यांवर कारवाई…

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :-
उंब्रज पोलीस टीमची कारवाई.
करणेबाबत उंब्रज पोलीस ठाण्यास दिले सुचनाप्रमाणे कारवाई करणेत आली आहे.
दिनांक १५/०८/२०२३ रोजी सहा. पोलीस निरीक्षक, प्रशांत बधे यांना मिळाले बातमीप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, पो. हवा, धुमाळ, पो. कॉ. थोरात, पो. कॉ. माने, पो. कों, कुंदे, पो. कॉ. लोहार, पो. कॉ. कोळी, होमगार्ड मोरे यांना माहिती देवून छापा टाकून खात्री करणेबाबत सुचना दिल्याप्रमाणे मोजे उंब्रज ता. कराड गांवचे हद्दीत उंब्रज ते चोरे जाणारे रोडचे नजीक बाभळीच्या झाडाच्या खाली ७ लोक पैजेवर तीन पानी जुगार खेळत असलेचे मिळुन आलेले आहेत. त्यांचे कब्जात मिळालेल्या तीन पानी पत्त्यांसह ७ मोबाईल, ६ मोटर सायकली व रोख रक्कम असा एकूण ३,०८,९४०/- रुपयांचा मुद्देमाल उंब्रज पोलीस टीमने हस्तगत केलेला असुन १) शिवा बाबु राठोड रा. शिवडे ता. कराड, २) रवि नाना चव्हाण रा. शिवडे ता. कराड, ३) राजू पोपट जाधव रा. उचले गल्ली उंब्रज ता. कराड, ४) विलास शिक राठोड रा. उंब्रज ता. कराड, ५) संजय भिकु चव्हाण रा. उंब्रज ता. कराड, ६) रामचंद्र चंद्रकांत जाधव रा. उंब्रज ता. कराड, ७) बाळू वेनू राठोड रा. उंब्रज ता. कराड यांना ताब्यात घेणेत आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक सो, सातारा श्री. समीर शेख साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक सो, श्री. बापू बांगर साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सगो, श्री. अमोल ठाकुर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, पो. हवा. संजय धुमाळ, पो. कॉ. मयुर थोरात, पो. कॉ. श्रीधर माने, पो. कॉ. गणेश कुंदे, पो. कॉ. सुनिल लोहार, पो. कॉ. राजकुमार कोळी, होमगार्ड स्वप्नील मोरे यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com