जुगार अड्ड्यांवर रामनगर पोलीसांनी 1 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 21 जुगाऱ्यांविरूध्द केले गुन्हे दाखल..

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :– याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी आगामी निवडणूक सन उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना त्यांचे त्यांचे पो ठणे परीसरातील अवैध धंद्यावर प्रभावी धाडी घालून दर्जेदार कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत..आणि या अनुषंगाने संपूर्ण गोंदिया जिल्हयात उपविभागिय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात प्रभावी धाडी घालून दर्जेदार कारवाई करण्यात येत आहे…..या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी, रोहिणी बानकर, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे पो. स्टे. रामनगर यांचे मार्गदर्शनात दिनांक- 25/03/2024 रोजी होळी सणानिमित्त गुप्त बातमीदार कडून प्राप्त खात्रीशीर बातमीचे आधारे- रामनगर पोलीस स्टाफनी सापळा रचून पो. ठाणे रामनगर परिसरातील तीन जुगार अड्ड्यावर प्रभावी धाडी घालून *जुगाराचा खेळ खेळणाऱ्याना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली —
जुगार रेड कारवाई क्र.-1) वार्ड क्र.3 कुडवा गोंदिया. येथे सार्वजनिक ठिकाणी सिमेंट रोडवर बसून 52 तासपत्तीवर पैशांची बाजी लावून 10 इसम हे जुगाराचा हारजीतचा खेळ खेळताना मिळून आले………मिळुन आलेल्या इसमांचे ताब्यात, अंगझडती मध्ये तासपत्ते नगदी 3040/- रुपये वेगवेगळ्या कंपनीचे 9 महागडे मोबाईल किमती 1,06,000/- रु. असा एकूण किमती 1,09,090/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला…
जुगार रेड कारवाई नंबर- 2) मौजा- कटंगीटोला रेल्वे फाटक परिसर गोंदिया येथे सार्वजनिक ठिकाणी 7 इसम हे 52 तासपत्तीवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगाराचा खेळ खेळताना मिळून आले…..मिळुन आलेल्या इसमांचे ताब्यात, आणि अंगझडतीमध्ये तासपत्ते , नगदी 3450/- रुपये एक रियल मी कंपनीचा मोबाईल किमती 6,000/- रुपये असा एकूण किमती 9500/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला.
जुगार रेड कारवाई नंबर- 3) मौजा- विजयनगर कटंगी परिसर गोंदिया येथे पाणी टंकीजवळ 4 इसम हे 52 तासपत्तीवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगाराचा खेळ खेळताना मिळून आलेत ……..मिळुन आलेल्या इसमांचे ताब्यात, अंगझडतीमध्ये तास पत्ते नगदी 3050/- रुपये एक अँड्रॉइड मोबाईल किमती 4000/- रुपये असा एकूण किमती 7080/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला … अश्याप्रकारे केलेल्या एकूण 3 धाड कारवाईत जुगार खेळणे करीता वापरते तासपत्ते, नगदी 9540 आणि महागडे मोबाईल फोन असा एकूण किंमती 1, लाख 06 हजार 100/ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे…..
सदर धाड कारवाईची रीतसर पंचनामा कारवाई करून जप्त मुद्देमाल आरोपीतांना ताब्यात घेऊन जुगाराचा खेळ खेळणारे आरोपीत ईसंम नामे –
1) राजकुमार भाऊदास खोब्रागडे
2) लेनिन सुरेश रंगारी.
3) विक्रांत सुरेश रंगारी .
4) राजेश मच्छिंद्र खोब्रागडे
5) सुलेख राजेंद्र मेश्राम
6) मिथुन चरणदास वैद्य
7) देवेंद्र शिवलाल वराडे
8) टीकाराम जगन्नाथ रामटेके
9) अंकुश दिलीप गणवीर
10) रितेश कुमार सुरेश डोंगरे
11) दीपक लक्ष्मण मरस्कोल्हे
12) दिनेश प्रभुजी मोरदेवे
13) रवी नानू नांदणे.
14) संतोष हिरालाल सनीचर
15) प्रेमलाल फदाली बागडे
16) ब्रह्मानंद लिखीराम कोकोडे
17) छगन मंगल उईके
18) सुनील चैतराम सिल्लारे
19) श्रीराम बापू पाचे
20) नरेश चिंतामण
21) राजेश संपत पाचे*
यांचेविरुद्ध पोलीस ठाणे रामनगर येथे अनुक्रमे अपराध क्रं. गुन्हा रजिस्टर क्रमांक 82, 83, 84/2024 कलम 12 (A) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत….
सदरची धाड कारवाई मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनात सपोनी उमेश माळी, स.फौ.राजेश भुरे, पो.हवा.राजेश भगत, छत्रपाल फुलबांधे, सुनीलसिंह चौव्हाण, बाळकृष्ण राऊत, कपिल नागपुरे, यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com