पत्रकार प्रसाद गोरेगांवकर यांच्या लढ्याला यश ; शासकिय जमिन लवकरच शासनाच्या ताब्यात….

0
Spread the love

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड

माणगांव :-कार्यकारी अभियंता श्री. नामदे यांच्या लेखी अश्वासनानंतर पत्रकार प्रसाद गोरेगांवकर यांचे १३ तासांनी उपोषण मागे उपोषणाला अनेक मान्यवरांचा पाठींबा.. गोरेगांवात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत वैयक्तिक आर. के. फिटनेस या नावाने व्यायाम शाळेचे बांधकाम पुर्ण झाले असून या बांधकामाकरीता कोणतीही पुर्व परवानगी न घेता हे बांधकाम वैयक्तिक रित्या करण्यात आले आहे.  या शासनाच्या जागेत अनाधिकृतपणे करण्यात आलेल्या बांधकामाविरोधात गेला दिड वर्षापासून पत्रकार प्रसाद गोरेगांवकर हे लढा देत आहेत.. या आधी  सदर जागेची मोजणी करण्यासाठी त्यांना २६ जानेवारी २०२४ रोजी  सार्वजनिक बांधकाम उपविभाग माणगांव कार्यालयाबागेर उपोषण केले होते. उपोषणा दरम्यान त्यांना पत्र देऊन लवकरच मोजणी करण्यात येईल व मोजणीत सा. बां.  खात्याची जागा निघाल्यास कारवाई करण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले होते. 

आश्वासनानंतर १८ मार्च २०२४ रोजी  या  जागेची मोजणी करण्यात आली. मोजणी मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत बांधकाम झाल्याचे निष्पन्न झाले आहे यानंतर गेली वर्षभर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या झोपलेल्या अधिकाराऱ्यांना पत्रकार प्रसाद गोरेगांवकर जागं करण्याचे काम करत आहेत. यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांना पत्र देऊन दि. जानेवारी २०२५ पुर्वी सदर अनाधिकृत बांधकाम तोडण्याबाबत कळवत १० जाने. २०२५ पुर्वी न तोडल्यास २६ जानेवारी २०२५ रोजी उपोषण करावे लागेल असे कळविले होते  परंतु कोणतीही कारवाई न केल्याने अखेेर पत्रकार प्रसाद गोरेगांवकर यांनी २६ जानेवारी २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाबाहेर सकाळी १० वाजता उपोषण सुरु केले होते.

या उपोषणा दरम्यान बापुसाहेब सोनगिरे, हरेश शेठ, युवा उद्योजक वसिम सनगे, भाजप चे तालुका अध्यक्ष गोविंद कासार, उपाध्यक्ष राजु मुंढे, कार्यकर्ते अशोक यादव चिन्मय मोने, जेष्ठ पत्रकार मस्जिद हाजिते, शिवसेना युवासेना जिल्हाध्यक्ष विपुलजी उभारे, गोरेगांव विभागीय अध्यक्ष दिनेशजी हरवंडकर, उमेश लाड, दिपक भोईर तसेच पत्रकार सचिन पवार, दिपक दपके, नंदकुमार चांदोरकर, नितेश पुरारकर, रोहिदास गर्जना परिवारचे सदस्य यांनी प्रत्यक्ष भेट घेत पाठींबा दर्शविला होता.. तसेच अनेक मित्र परिवार तसेच हितचिंतकांनी देखील या उपोषणाला फोन द्वारे प्रसाद गोरेगांवकर यांना पाठींबा देत शुभेच्छा दिल्या होत्या..

दरम्यान उपकार्यकारी अभियंता श्री. गणगणे, सहाय्यक अभियंता माळी यांनी कारवाई करतो आपण उपोषण मागे घ्या अशी विनंती वारंवार केली परंतु प्रसाद गोरेगांवकर यांनी उपोषण मागे घेतले नाही… त्यांनी शासकिय जमिनीत झालेल्या अतिक्रमणावर तोडण्याचे आदेश येईपर्यत सिल लावण्यात यावे मी उपोषण मागे घेतो असे सांगीतले होते परंतु तसं करता येत नाही असे उत्तर मिळाल्याने त्यांनी उपोषण चालुच ठेवले होते..माणगांव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक बोऱ्हाडे यांनी देखील उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली होती परंतु प्रसाद गोरेगांवकर हे आपल्या म्हणण्यावर ठाम होते अखेर रात्री उशिरा कार्यकारी अभियंता श्री. नामदे आले त्यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी या सर्व प्रकारची तसेच जागेची पडताळणी करुन १५ मे पर्यत सदर अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन दिल्याने पत्रकार प्रसाद गोरेगांवकर यांनी अखेर रात्री १२.२५ ला उपोषण मागे घेतले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट