स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व म्हसवड पोलीस ठाणे यांची संयुक्त धडाकेबाज कारवाई एन.डी.पी.एस कायदयाअंतर्गत १५ लाख दोन हजार पाचशे रुपयांचा ६० kg किलो गांजा जप्त…
उपसंपादक -रणजित मस्के
सातारा : श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी एन. डी. पी. एस. कायद्याअंतर्गत कारवाया करणेबाबतच्या सूचना श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा तसचे सर्व प्रभारी अधिकारी सातारा जिल्हा यांना दिलेल्या आहेत.


श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील श्री रविंद्र मोरे सहा पोलीस
निरीक्षक यांचे अधिपत्याखाली पथक तयार करून त्यांना एन. डी. पी. एस. कायदया अंतर्गत कारवाई करणेबाबत सुचना दिल्या. दि.२७/०१/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील श्री रविंद्र भोरे सहा पोलीस निरीक्षक व त्यांचेसोबतचे अंमलदार म्हसवड ता. माण परिसरात सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना त्यांचे पथकाला गोपनीय बातमीदारमार्फत बातमी मिळाली की मां पाणावण ता.माण जि सातारा येथील चरण लालासो शिंदे याने त्याच राहते घराजवळील शेतामध्ये गांजा अंमली पदार्थाचा साठा करून उसाचे शेतामध्ये लपवुन ठेवला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर श्री रविंद्र और सहा पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेकडील अंमलदार तसेच महसवड पोलीस ठाणेकडील अंमलदार व पंच राजपत्रित अधिकारी यांना मिळाले बातमीचा आशय समजावुन सांगुन रेट कामी लागणारे साहीत्य घेवून, तसेच वरिष्ठांच्या सूचनेनुसार व परवानगीने सरकारी व खाजगी वाहनाने मिळाले बातमी ठिकाणी जावून सापळा रचला असता तेथे बातमीतील इसम उसाचे शेतालगत उभा असलेला दिसला सापळयातील अंमलदार यांनी त्यास ताब्यात घेवून पोलीसांनी त्याला आपला परिचय देवून त्याचे नांव गांव विचारून छाप्याचा उददेश समजावुन सागुन मिळाले बातमीच्या अनुशंगाने उसामध्ये शोध घेतला असता उसामध्ये एका ठिकाणी तीन पोती लपवुन ठेवलेली दिसली त्याबाबत त्याला विचारणा केली असता तो कारावरा होवून उडवाउडवीची उत्तरे देवु लागला त्यांस अधिक विश्वासात घेतले असता त्याने त्या पोत्यामध्ये गांजा असल्याने सांगून तो त्याचे मालकीचा असल्याचे सांगितले. तेथे कारवाईत उपस्थित असलेल्या फॉरेन्सिक टिमने सदर गांजाची किटददवारे तपासणी करून त्याचे फोटो प्राप्त करून घेवून वजन काट्यादवारे त्याचे जागेवर वजन केले असता त्यांचे वजन ६०.१०० कि.ग्रॅम भरले मिळाले मातास पोलीसांनी पंचासमक्ष जागीच गली करून सदरचा मुददमाल जप्त केला सदर बाब म्हसवड पोलीस ठाणेस २३/ २०२३ गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थं प्रतिबंधक अधिनियम १९८५ चे कलम ८
(क). २०(ब), (ii) (क) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे..
श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या सूचनेप्रमाणे राजकुमार भुजबळ, सहा पोलीस निरीक्षक म्हसवड पोलीस दाणे, रविंद्र भोरे, सहा पोलीस निरीक्षक नेम स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, रविंद्र डोईफोडे, पोलीस उपनिरीक्षक म्हसवड पोलीस ठाणे, पाहवा अतिश घाडगे, संजय शिर्के, सावर मुल्ला, मंगेश महाडीक, गणेश कचरे, मनौर मुल्ला, पोना प्रमोद सांवत, अमित सपकाळ, गणेश कापर, पोको मयुर देशमुख, धिरज महाडीक, मोहसीन मामीन, संकेत निकम, वैभव सावंत, स्वप्नील म्हसवड पोलीस नेमणुकीचे पोको काकडे, शिरकुळे, भादुले तसेच फॉरेन्सिक टिमचे पोहवा मोहन नाचन, पाको अनिल खटावकर, राजीव कुंभार यांनी सदरची कारवाई केलेली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा व श्री चा बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे
आरोपीचे नांव चरण लालास शिंदे, वय ३० वर्षे, रा. पाणवण ता माण जि सातारा
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com
