गोंदिया वनविभाग व पोलीस विभागाची संयुक्तरित्या कारवाई अवैधरित्या हातभट्टी दारु निर्मितीचे अड्डड्डे केेले उध्वस्त…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :-गोंदिया वनविभागांतर्गत वनक्षेत्रात अवैधरित्या सुरु असलेल्या मोहफुलाच्या भटटींवर गोंदिया वनविभाग व पोलीस विभागाकडुन संयुक्तरित्या गस्ती कार्यक्रमाअंतर्गत धाडी टाकून अवैधरित्या दारू निर्मितीच्या भटटया नष्ट करुन सामग्री जप्त करण्यात आले आहे..
▶️ याबाबत थोडक्यात माहिती अशी की, लोकसभा सार्वत्रिक निवडणुक- 2024 च्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, उपवनसंरक्षक गोंदिया श्री. प्रमोदकुमार पंचभाई, यांनी गोंदिया वनविभागांतर्गत वनपरिक्षेत्रात वनविभाग व पोलीस विभाग असे संयुक्तगस्ती चे कार्यक्रम घेण्याबाबत व गस्ती कार्यक्रमाअंतर्गत वन परिक्षेत्रातील अवैध धंदे जसे हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्या अड्ड्यांवर प्रभावी धाडी घालून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते……
या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे निर्देशाप्रमाणे दिनांक-13/04/2024 रोजी गोंदिया वनविभागांतर्गत गोंदिया वनपरिक्षेत्रातील मौजा- पांगडी येथील वनक्षेत्रात व लगतचे क्षेत्रात वनविभाग व पोलीस विभागाचे अधिकारी/अंमलदार यांनी पायदळ…. गस्ती दरम्यान मोहाफुलापासून अवैधरित्या हातभट्टी दारु निर्मितीच्या/ भटटयावर धाडी घालून हातभट्ट्या उध्वस्त करून नष्ट केल्या..
गोंदिया वनपरिक्षेत्रातील पांगडी येथील वनक्षेत्रात व लगतचे क्षेत्रात संयुक्त गस्ती शोध मोहीम दरम्यान पांगडी बिट, कक्ष क्रमांक 2403 (संरक्षीत वन) मधील पान घाट नाल्याचेवर वनविभागाच्या जागेमध्ये जमीनीत खडडे खोदुन प्लॉस्टीक पिशवीमध्ये मोहफुलाचा (सडवा) एकुण 70 कि.ग्रॅ. मिळून आला……. चुटीया बिट कक्ष क्रमांक 387 (संरक्षीत वन) येथे खडडयांमध्ये एकुण 340 कि. ग्रॅ. मोहफुल (सडवा) मिळून आला…तसेच संयुक्तरित्या आजुबाजुच्या परिसराची तपासणी केली असता, एकुण 16 खडडयांमध्ये अंदाजे प्रत्येक खडडयात 40 किलो सडवा मोहाफुल रसायन असा एकुण अंदाजे 640 कि. ग्रॅ. मुद्देमाल मिळुन आला. तसेच सदर ठिकाणी लहान मोठ्या आकाराच्या तिन जर्मन करची असा मुददेमाल मिळून आल्याने संपूर्ण मुददेमाल जप्त करण्यात आलेला असून वनविभाग व पोलीस विभागाकडून सदर प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरु आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com