स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली व भिलवडी पोलीस ठाणे यांची संयुक्त कारवाई मोटार सायकल चोरी करणारा चोरटा जेरबंद ६,६३,०००/- रु.च्या २१ मोटार सायकली हस्तगत,

0
WhatsApp Image 2024-12-31 at 9.37.00 PM
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सांगली

पोलीस स्टेशन

भिलवडी पोलीस ठाणे

गु.घ.ता. वेळ

दि. ०७/०८/२०२४ रोजी १९.१५ वाजता ते २०.१५ वाजणेचे दरम्यान

२१ गुन्हे उघडकीस

अपराध क्र. आणि कलम

मु.र.नं. ७९/२०२४बी.एन.एस. कलम ३०३ (२) प्रमाणे

फिर्यादी नाव

प्रकाश अशोक मगदूम राहणार- खंडोबाचीवाडी, ता-पलूस जि- सांगली

आरोपीची माहिती कशी प्राप्त झाली

गु.दा.ता. वेळ

दि. ०९.०९.२०२४ रोजी १२.५३ वा.

पोकों/ ऋतुराज होळकर

पोकों/ सुमित सुर्यवंशी

पोकों/ विनायक सुतार

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे

मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली

पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा,

सहा. पोलीस निरीक्षक भगवान पालवे, भिलवडी पोलीस ठाणे

पोलीस उप-निरीक्षक कुमार पाटील, स्था. गु. अ. शाखा,

पोहेकों/नागेश कांबळे, बसवराज शिरगुप्पी, संदीप पाटील, अतुल माने, अरुण पाटील,

पोना/सुशिल मस्के, श्रीघर बागडी, पोकों/सूरज थोरात, प्रमोद साखरपे, ऋतुराज होळकर, सुमित सुर्यवंशी, विनायक सुतार, चापोकों/गणेश शिंदे, स्था.गु.अ.शा,

पोहेकों/महेश घस्ते, प्रविण सुतार, पोना/भाऊसाहेब जाधव, पोकों/धीरज खुडे, संतोष जाधव

भिलवडी पोलीस ठाणे

पोकों / कैप्टनसाहेब गुंडवाडे, विवेक सांळुखे सावचर पोलीस ठाणे

अटक वेळ दिनांक दि.२५/१२/२०२४ रोजी २२.५८ वाजता

आरोपीचे नाव पत्ता

सुदिप अशोक चौगुले, वय ३७ वर्षे, रा. पाटील गल्ली, भिलवडी ता-पलूस जि-सांगली

गुन्हयाची थोडक्यात हकीकत

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन मोटार सायकल चोरी करणाऱ्या संशयीत इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.

त्या अनुशंगाने दि. २५/१२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उप-निरीक्षक कुमार पाटील यांचे पथकातील पोकों / ऋतुराज होळकर यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली, सांगलीवाडी येथील सिध्दीविनायक चौक येथे कदमवाडी ते सांगलीवाडी जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम चिना नंबर प्लेटची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकलविक्री करण्याकरीता येणार आहे.

नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे सांगलीवाडी येथील सिध्दीविनायक चौक येथे कद‌मवाडी ते सांगलीवाडी जाणाऱ्या रस्त्यावरजावून निगराणी करत असताना, एक इसम हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लसमोटार सायकल जवळ थांबलेला दिसला. त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने पोलीस उपनिरीक्षक, कुमार पाटील व पथकाने सदर इसमाला पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव सुदिप अशोक चौगुले, वय ३७ वर्षे, रा. पाटील गल्ली, भिलवडी ता-पलूस जि- सांगली असे असल्याचे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक, कुमार पाटील यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष त्याचेकडे असलेल्या मोटार सायकलीच्या मालकी हक्काचाबत विचारणा केली असता, काही दिवसापूर्वी माळवाडी गांवातील आठवडा बाजारातून सदरची मोटार सायकल चोरी केली होती. ती मोटर सायकल विक्री करण्यासाठी तो सांगलीवाडी येथे आला असल्याची कबूली त्याने दिली. त्यास आणखी विश्वासात घेवून त्याचेकडे अधिक तपास केला असता सांगितले की, त्याने मागील काही दिवसात वेगवेगळ्या ठिकाणावरुन आणखी काही मोटर सायकली चोरी केलेल्या आहेत. त्या मोटरसायकली त्याने त्याचे वसगडे गावचे हद्दीत असले शेतात लावलेल्या आहेत. त्या मोटार सायकली विक्री करावयाच्या आहेत. म्हणुन त्यातील एक मोटर सायकल घेवुन तो आज रोजी विक्री करीता आलो असल्याचे सांगितले. लागलीच दोन पंचासमक्ष नमूद दोन्ही ठिकाणांचा पंचनामा करुन एकूण ०९ मोटार सायकल ताच्यात घेऊन तसा सविस्तर पंचनामा करण्यात आला. सदरच्या मिळालेल्या मोटार सायकलीबाबत पोलीस स्टेशनचे क्राईम अभिलेख पडताळले असता, भिलवडी, पलूस, खंगली शहर, जत, कडेगाव तसेच चिंचणी वांगी पोलीस ठाणेस मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली.

सदर आरोपीव जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी भिलवडी पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आलेनंतर भिलवडी पोलीस ठाणे व स्था. मु. शाखा, सांगली यांनी आरोपी हा अटकेमध्ये असताना त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याने वेगवेगळ्या ठिकाणावरुन आणखी काही मोटर सायकली चोरी बाचतची कबूली दिली. लागलीच भिलवडी पोलीस ठाणेकडील गुन्हयांचे तपासी अंमलदार यांनी दोन पंचासमक्ष वेगवेगळ्या गुन्हयातील आणखीन १२ मोटार सायकली सविस्तर पंचनाम्याने जप्त केल्या असून सदर आरोपी कडून आतापर्यंत एकूण २१ मोटार सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. पुढील तपास भिलवडी पोलीस ठाणे करीत आहेत.

सदर आरोपी यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड नसून तो आठवडी बाजार, गर्दीची ठिकाणे, जास्त वाहने असलेली पार्कीगची ठिकाणे, बिअर बार अशा ठिकाणांहून मोटार सायकली चोरीत असे. त्यामुळे स्था. गु. शाखा, सांगली तसेच जिल्हयातील पोलीस ठाणेकडून वेगवेगळे पथके नेमण्यात आलेली आहेत. त्यामुळे नागरिकांना पोलीस प्रशासना मार्फत अवाहन करण्यात येते की, आपल्या मोटार सायकलीचे जुने लॉक खराच झाले असल्यास ते वेळेवर बदलून प्यावे तसेच मोटार सायकलीला दुसरे लॉक लावलेस वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध घालता येईल. पोलीस प्रशासन आणखीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट