जिल्हा परिषद हॉयस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आमगाव येथे, Student Police Cadet Programme चे आयोजन

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

गोंदिया

महाराष्ट्र शासनामार्फत Student Police Cadet Programme च्या कार्यक्रमाची अमलबजावणीकरिता ८ वी व ९ वी वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये चांगली नितीमुल्ये रुजवुन जबाबदारी नागरिक बनविणे आहे, त्याचे कारण त्या वर्गाचे वयोगटातील विद्यार्थ्याचे बुध्दीमत्ता लवचिक असते व आकलन शक्ति विपुल असते. त्या आधारावर प्रशिक्षणात गुन्हयास प्रतिबंध, रस्ते सुरक्षा व वाहतुक जागरुकता, सायबर क्राईम, भ्रष्टाचार निर्मुलन, लिंग संवेदनशिलता, मुल्ये व नितीशास्त्र, सहनशिलता, पोलीस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, जनताभिमुख पोलीसिंग, महिला व बालकांची सुरक्षितता, बालविवाह, आईवडील गुरु यांचा सन्मान, समाजाचा विकास, दृष्ट सामाजिक प्रवृत्तीत्त आळा घालणे, नितीमुल्ये, शिस्त, आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता इत्यादी विषयावर सरकारी शाळेतील ८ वी व ९ वी वर्गातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे मानस आहे

त्याअनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १६/०७/२०२५ रोजी जिल्हा परिषद हॉयस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, आमगाव येथे जावुन तेथील ०८ वी व ०९ वी वर्गातील विद्यार्थ्यांना पोलीस हवालदार लिओनार्ड मार्टिन व राज वैद्य यांनी SPC कार्यक्रम घेण्यामागचे उद्देश सांगितले. तद्नंतर महिला पोलीस निरीक्षक श्रीमती नंदिनी चानपुरकर, सपोनि निलेश डाबेराव, महिला पोलीस उप-निरीक्षक ऑफरीन शेख, सपना सिडाम, जयश्री गवाने, सफौ राजेश शेंद्रे व मपोहवा तनुजा मेश्राम यांनी मार्गदर्शन करुन महाराष्ट्र पोलीसांची ओळख कामकाज व त्यांच्या इतिहास, गुन्हयास प्रतिबंध, रस्ते सुरक्षा व वाहतुक जागरुकता, सायबर क्राईम, बालविवाह, भ्रष्टाचार निर्मुलन, आई-वडील गुरु यांचा सन्मान, महिला व बालकांची सुरक्षितता, स्वच्छता व पो.स्टे. चे कामकाज याबाबत अत्यंत मोलाचे मार्गदशन केले.

सदर कार्यक्रमात जिल्हा परिषद हॉयस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आमगाव येथील अति. कार्य. प्राचार्य श्रीमती कुथीरकर मॅडम, कु. ए.बी.यादव मॅडम, श्री जे. आर. शुक्ला आदि उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन जिल्हा परिषद हॉयस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आमगाव येथील कु. ए. बी. यादव मॅडम यांनी केले. सदर प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडण्याकरिता पोलीस निरीक्षक श्रीमती नंदिनी चानपुरकर, पोहवा लिओनार्ड मार्टिन, नरेश गायधने, राज वैद्य, सत्यशिला छिपे व पोकॉ शुभम शेंडे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट