झोमेंटो बॉयला मारहाण करण्याऱ्या अज्ञात गुन्हेगारांना लष्कर पोलीस स्टेशन कडील तपास पथकाकडून अवघ्या ८ तासाच्या आत ताब्यात घेऊन केला गुन्हा उघड..

उपसंपादक – रणजित मस्के
पुणे :– झोमेंटो बॉय ला मारहान करण्याऱ्या अज्ञात गुन्हेगारांना लष्कर पोलीस स्टेशन कडील तपास पथकाकडून अवघ्या ८ तासाच्या आत ताब्यात घेऊन केला गुन्हा उघड..!
आज दि. ११/०२/२०२४ रोजी सायंकाळी १९/१० वा ते १९/३० वाच्या दरम्यान वाच्या सुमारास फिर्यादी नामे नजिर फारुख बागवान वय ४० वर्षे रा-४५७ सेंटर स्ट्रीट कॅम्प पुणे हे कैम्प मध्ये असणाऱ्या दादुस स्वीट मार्ट या दुकानातुन झोमॅटो ची ऑर्डर घेऊन पार्क केलेली गाडी काढीत असताना अचानक एका अज्ञात दुचाकीस्वाराने धडक झाल्याने दुचाकी स्वाराने त्याचे साथीदार बोलावुन फिर्यादी ला मारहान केली म्हणून लष्कर पोलीस स्टेशन येथे गुरन ५४/२०२४ भादवि ३२४, ३२३,५०४,३४ अन्वये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नरेंद्र मोरे लष्कर पोलीस स्टेशन पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली लष्कर पोलीस स्टेशन चे तपास पथकातील उपनिरीक्षक श्री. महेंद्र कांबळे व तपास पथकाचा स्टाफ हे करीता असताना सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातुन आरोपी निष्पन्न करुन आरोपींना मंगळवार पेठ पुणे व येरवडा भागातील असल्याचे गुप्त बातमी मिळाली होती. सदर आरोपीची नावे ही १) सोहेल शेख रा. मंगळवार पेठ पुणे २) सहिल कुरेशी रा. २२६ मंगळवार पेठ ३) आयान शेख रा. मंगळवार पेठ पुणे व ४) फैजान आश्पाक शेख रा. सिदिधक्षा बाबा हाऊसिंग सोसायटी येरवडा पुणे हे असल्याचे खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुप्त बामतीद्वारामार्फत आरोपींना वेगवेगळ्या भागातुन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता आरोपीनी गुन्हा केलेचे कबुल केलेने आरोपींना अटक करण्यात आली होती.
यातील आरोपी नामे फैजान आश्पाक शेख रा. सिदिधक्षा बाबा हाऊसिंग सोसायटी येरवडा पुणे याच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर चा आरोपी हा मा. पोलीस उपायुक्तसो परि-१ यांच्या कडुन दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला होता. तडीपारीचा आदेश भंग करुन सदर आरोपीने गुन्हा केलेने आरोपीवर महा. पोलीस अधिनियम कायदा कलम १४२ ची कलम वाढ करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्तसो अमितेश कुमार सो, सह पोलीस आयुक्तसो प्रविण पवार साो, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील साो, मा. पोलीस उपायुक्तसो परि-२ स्मार्तना पाटील सो, मा. सहा. पोलीस आयुक्तसो संजय सुर्वेसाो, मा. वरिष्ठ पोलीस निरिक्षक नरेंद्र मोरे, मा. सहा. पोलीस निरीक्षक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, पोहवा विलास शिंदे, पोहवा महेश कदम, पोशि लोकेश कदम, पोशि सागर हराळ यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com