झोमॅटो डिलीव्हरी इसमास लुटणा-या टोळीला अटक करुन त्यांचेकडुन गृहयात गेलेली रोख रक्कम ८०,०००/-रुपपासह मुददेमाल केला हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखा व हवेली पोलीस स्टेशनची कारवाई…

सह संपादक -रणजित मस्के
पुणे

हवेली पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६/२०२५ बी एन एस ३१०/२), ३०९ (६),३२४(४), ३५२आर्म अॅक्ट ४ (२७) प्रमाणे दिनांक ०८/०६/२०२५ रोजी गुन्हा घडलेला असुन सदर गुन्हयातील फिर्यादी नामे रोहित नरेंद्र चिंचुरकर वय २१ रा स्वप्नमाला अपार्टमेन्ट, तिसरा मजला, दत्तवाडी पुणे हा दिनांक ०८/०६/२०२५ रोजी पहाटे ०३:०० वा. सुमारास मौजे मालखेड ता हवेली जि पुणे गावचे हददीत झोमेटो फुड डिलीव्हरी ऑर्डर देण्यासाठी मोटार सायकलवरुन जात असताना तीन मोटार सायकल वरुन आलेल्या चार अनोळखी इसमांनी त्यास थांबवून शिवीगाळ करुन कोणत्यातरी धारधार हत्यांराने व लाथा बुक्यानी मारहाण करुन जखमी केले तसेच स्कुरटरचे दोन्ही टायर कोणत्यातरी धारधार वस्तूने पंक्चर करुन त्यांचेजवळील दोन मोबाईल व २,५१०/- रोख रक्क्मअसा एकुण ८२,५१०/- रुपये किमतीचा माल जबरी चोरी करुन नेले बाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रात्रीच्या वेळी पुणे पानशेत रोडवर झोमॅटो डिलीव्हरी इसमास लुबाडून आले होते. सदर गुन्हयांचे गांभीर्य वाढल्याने मा. पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषगाने योग्य ते मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडून सुरू करण्यात आला. घटनास्थळांची पाहणी करुन आरोपीच्या मोटार सायकल ज्या दिशेने गेली आहे त्या रोडवरील सीसीटिव्हि फुटेज तपासणी करण्यात आली. सदरच्या फुटेज मध्ये उपयुक्त माहिती प्राप्त झाली की, सदर गुन्हयात एकुण तीन मो.सा.व आठ आरोपीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. सीसीटिव्हि फुटेजची पाहणी दरम्यान सदरचे इसम हे त्यांचे दुचाकीवरुन, डोणजे येथून सिंहगड किल्ला, खेडशिवापुर, मरीआई घाट, बोपदेव घाट मार्गे पुणे शहरातील कात्रज या परीसरात आलेचे निष्पन्न करुन गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि, खानापुर येथे एका डिलेव्हरी बॉयला लुटणारे इसम नामे यश किरण गायकवाड रा-चव्हाणनगर धनकवडी हा त्यांचे साथीदारा सोबत तो शिंदेवाडी येथील बिज जवळ येणार असल्याची बातमी मिळालेने बातमीच्या आधारे सापळा लावून दोन पथके तयार करुन आरोपी इसम नामे १) यश उर्फ गुडडया किरण गायकवाड वय १९ रा चव्हाणनगर धनकवडी पुणे ता हवेली जि पुणे २)श्रीनिवास ऊर्फ चपट्या सुरेश धीरे वय २० रा कात्रज मांगडेवाडी पुर्ण, ३) अयीकेष शेखर पापळ वय १९ रा कात्रज पुणे ४) हंत अविनाश भांगरे वय २० रा चव्हाणनगर धनकवडी पुणे व १ विधी संघर्षित बालक यास ताब्यात घेवुन त्यांना विश्वासात घेवुन सदर गुन्हयांचे अनुषगाने त्यांचे कडे तपास केला असता त्यांनी यातील फिर्यादी यांस मालखेड गावचे हददीत अडवुन आम्ही व आमचे इतर साथीदार इसम नामे १। किरण दत्तात्रय पांगारे रा चव्हाणनगर पुणे, २) मयुर विष्णु जावीर रा चव्हाणनगर पुणे व ३) अनिकेत नामदेव लोहकरे रा चव्हाणनगर धनकवडी पुणे यांनी त्यांचेकडील दोन मोबाईल व पैसे काढून घेतले आहेत असे कबुन केल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडून दरोडा टाकतेवेळी अॅपल कंपनीचा १६ प्रो व रिअलमी कंपनीचा असे दोन मोबाईल किंमत रुपेय ८०,०००/- व गुन्हयात वापरण्यात आलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. तसेच १) किरण दत्तात्रय पांगारे रा चव्हाणनगर पुणे, २) मयुर विष्णु जावीर रा चव्हाणनगर पुणे व ३) अनिकेत नामदेव लोहकरे रा चव्हाणनगर धनकवडी पुणे यांचे बाबत विचारपुस केली असता त्यंानी सागितले कि, ते सहकार पो स्टे गु रजि नंबर २५७/२०२५ बी एन एस १०३ वगैरे अनु क २ व ३ में. कस्टडी मध्ये आहेत व अनुक्रमांक १ सदर गुन्हयामध्ये फरार आहेत,
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री संदीप सिंह गिलल सो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे सोर, पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली विभाग, श्री सुनिलकुमारी पुजारी सो, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन बांगडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि दत्ताजीराव मोहिते, पोलीस अंमलदार, रामदास बाबर, अमोल शेडगे, अतुल डेरे, मंगेश भगत, हवेली पोलीस स्टेशनचे पोसई सुतनासे, पोलीस अंमलदार संतोष तोडकर, गणेश धनये, संतोष भापकर, व्यकंट काळे, सचिन गुंड यांनी केली आहे.