जव्हार पोलीस ठाणे यांचेकडून कत्तलीसाठी घेवून जात असलेल्या ११ गोवंश जातीचे जनावरे ताब्यात घेवून एकूण ७ आरोपींवर कारवाई..
प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर :– आगामी बकरी ईदच्या अनुषंगाने श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांची बैठक घेवून कायदा व सुव्यवस्था तसेच जनावरांची अवैध वाहतुक याविषयी मार्गदर्शन करून योग्य तो बंदोबस्त लावून हद्दिमध्ये गस्त घालणेबाबत सुचना दिल्या होत्या.

दिनांक १७/०६/२०२४ रोजी पहाटे ०३.०० वाजेच्या सुमारास जव्हार पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार हे हद्दित पेट्रोलींग करीत असताना फोनद्वारे व डायल ११२ मार्फत मौजे धारणपाडा ता. जव्हार येथील ग्रामस्थांकडुन माहिती मिळाली की, मौजे न्याहाळे ग्रामपंचायत पैकी थारणपाडा येथे एका आंब्याच्या वाडीमध्ये जनावरे बांधुन ठेवली असुन ती जनावरे एका मालवाहू ट्रकमध्ये भरत आहेत अशी माहिती मिळाली.

सदर माहिती मिळताच डायल ११२ वरील पोहवा /२०३ जाधव, पोअंम/१०४४ शेळके, पोअंम/१२२१ बोरसे (चा) असे घटनास्थळी रवाना झाले. तसेच काळी वेळात पोनि/संजयकुमार ब्राम्हणे, प्रभारी अधिकारी, जव्हार पोलीस ठाणे व सोबत पोउनि/दिघोळे, पोहवा/४६३ गायकवाड, पोहवा/१३५ पढेर, पोना/९२२ डामसे असे सदर घटनास्थळी रवाना झाले.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर तेथे जमलेल्या गावकऱ्यांकडे विचारपुस करता त्यांनी सांगितले की, मालवाहू ट्रकमध्ये जनावरे भरत असलेले संशयीत इसम गावकरी जमा होण्याची चाहुल लागताच तेथुन पळुन गेलेले आहेत. सदर ठिकाणी मालवाहू ट्रक क्र. MH. ४३. ए.ए. ४४७६ व तिच्या बाजुला एक ईनोव्हा कार क्र. MH. ४३. ए. ०४०० ही उभी असल्याचे दिसून आले. तसेच बाजुला आंब्याच्या झाडाला जनावरे बांधलेली दिसली.
सदर ठिकाणावरुन आरोपी हे पळुन गेलेले होते. घटनास्थळाच्या आजुबाजुच्या परिसरात आरोपीतांचा शोध घेतला असता सहा ते सात संशयीत इसम टेकडीच्या आड असल्याचे दिसुन आले असता पोनि/संजयकुमार ब्राम्हणे, पोहवा/गायकवाड, पोहवा/जाधव, पोहवा/पढेर, पोना/डामसे व चालक पो. अंम. बोरसे असे त्यांना पकडण्यासाठी त्यांचे दिशेने पळत जात असताना सदर इसमांनी हातात दगड घेवुन ते पोलीसांच्या दिशेने दगडफेक करु लागले.
त्यांचे दगड चुकवित त्यांना पकडण्यासाठी जात असताना सदर इसमांपैकी एक इसमाने पोशि/१०४४ शेळके यांचे अंगावर त्याचे हातातील लोखंडी धारदार कोयत्याने वार केला असता त्यांनी सदर कोयत्याचा वार चुकवीला. त्याच वेळी सोबतचे पोलीसांनी सदर
इसमास पकडुन त्याचे हातातील कोयता काढुन घेतला. तसेच इतर दोन इसमांना पकडले व बाकी इसम अंधाराचा फायदा घेवुन पळून गेले. त्यावेळी पकडलेल्या इसमांकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव १) शोएब खान खलील खान, वय २६ वर्षे, २) शेख साबीर शेख, वय २२ वर्षे, दोन्ही रा. अख्तराबाद देवीचा मळा दुसरी गल्ली तालुका मालेगाव जि. नाशिक, ३) सुमित लाजारस खरात, वय ३२ वर्षे, रा. कुरण रोड महादेव वस्ती संगमनेर ता. संगमनेर जि. अहमदनगर अशी असल्याचे सांगितले.
सदरच्या गायी या ते ईदच्या अनुषंगाने कत्तलीसाठी मालेगाव जि. नाशिक येथे घेऊन जात असल्याचे सांगितले व बाकीचे पळुन गेलेल्या साथीदारांची चौकशी केली असता त्यांची नावे १) लाल्या ऊर्फ हुसेन अब्बास शेख रा. सावळी विहीर शिर्डी, २) बबलु शेख रा. कुरण रोड संगमनेर, ३) मुसा हरुन शेख, रा. कुरण रोड ४) ट्रक चालक पलाडी (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) अशी असल्याचे सांगितले.
सदर ठिकाणावरुन सहा गाई व पाच वासरे असे एकुण अकरा जनावरे तसेच मालवाहतुक ट्रक क्रमांक एम.एच. ४३ बि.बि.४४६७ व इनोव्हा कार क्रमांक. एम.एच.४३ बि.०४०० असा १५,३८,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. ताब्यात घेतलेले जनावरे हे आमगाव येथील गोशाळेमध्ये जमा करत असून सदर घटनेबाबत जव्हार पोलीस ठाणे येथे भादंविसं कलम ३०७, ३५३, ३३६, ३४ सह प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (डी) (जी) (एच), सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ कलम ५, ९ सह मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १९२ (ए) केंद्रीय मोटार वाहन अधिनियम कलम १२५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढिल तपास हा वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि/अनिल दिघोळे हे करत आहेत. बाळासाहेव पाटील, पोलीस अधिक्षक, पालघर यांच्या संकल्पनेतुन तयार करण्यात आलेल्या जनसंवाद अभियाना अंतर्गत सर्व गावकऱ्यांना पोलीस ठाणेचे बिट अंमलदार, प्रभारी अधिकारी यांचे मोबाईल क्रमांक दिलेले असून अश्या स्वरूपाची कोणतीही घटना घडल्यास पोलीस ठाणे व डायल ११२ यावर फोन करुन पोलीसांना माहिती देणेबाबत सांगितले आहे. जनसंवाद अभियान अंतर्गत तेथील गावकऱ्यांशी प्रत्यक्ष संबंध व ओळख असल्याने सदरचा मोठा अनर्थ टाळता आलेला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com