चोरीच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींना अटक करून वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करण्यात जव्हार पोलीसांना मोठे यश….

उपसंपादक- रणजित मस्के
पालघर: दि.०३/०८/२०२२ रोजी फिर्यादी नामे श्री. भालचंद्र पांडुरंग पवार, वय ४२ वर्षे, व्यवसाय नोकरी, (प्रधान तंत्रज्ञ), रा. पोयशेत पो. जामसर, ता. जव्हार जि. पालघर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ईलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याचे कॉईल असे वर्णनाचे एकुण १५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन घेऊन गेले म्हणुन जव्हार पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. २६०/ २०२२ भा.द.वि.सं. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरील प्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेऊन श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशान्वये श्री. संजीव पिंपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग अतिरीक्त चार्ज जव्हार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सुधीर संखे, पोलीस निरीक्षक, जव्हार पोलीस ठाणे यांना पथक तयार करून गुन्ह्याचा तपास करण्याबाबत सुचना दिल्या. नमुद गुन्ह्यात कोणताही पुरावा अथवा धागेदोरे नसताना कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करुन तीन संशयीत आरोपींना ताब्यात घेवुन त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी नमुद गुन्हा केल्याचे कबुल केले.
तसेच आरोपींची अधिक कसून चौकशी केली असता त्यांनी खालीलप्रमाणे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
1) गुन्हा रजि. नं. व कलम ४०/२०२२ भा. दं. वि. सं. कलम ३७९ प्रमाणे.
2) १८८/२०२२ भा. दं. वि. सं. कलम ३७९ प्रमाणे.
पोलीस ठाणे जव्हार
3) १९३ / २०२२ भा. दं. वि. सं. कलम ३७९ प्रमाणे.
4) २०१ / २०२२ भा. दं. वि. सं. कलम ३७९ प्रमाणे.
5) २१८ / २०२२ भा. दं. वि. सं. कलम ३७९ प्रमाणे जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

