जत पोलीसांनी बंडा वाघमारे आणि उमदी पोलीसांनी श्रीमंत करपे व नवनाथ कराडेस केले हद्दपार…

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :-जत पोलीस ठाणे हद्दीतील १) बंडा ऊर्फ राहुल शिवाजी वाघमारे उमदी पोलीस ठाणे हद्दीतील २) श्रीमंत रामा करपे व ३) नवनाथ आमगोंडा कराडे याना हद्दपार करण्यात आले आहे.
जत पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार १) बंडा ऊर्फ राहुल शिवाजी वाघमारे, रा. निगडी कॉर्नर, जत व उमदी पोलीस ठाणे हद्दीतील २) श्रीमंत रामा करपे व ३) नवनाथ आमगोंडा करांडे यांना मा. अजयकुमार नष्टे, उपविभागीय अधिकारी, जत उपविभाग, जत यांनी सांगली जिल्हयाचे हद्दीतुन व सोलापूर जिल्हयातील सांगोला व मंगळवेढा या हद्दीतून ६ महिन्याचे कालावधिसाठी हद्दपार आदेश पारीत केला आहे. गुन्हेगारांची दहशत मोडुन काबुन त्यांचे समुळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभुमीवर सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे.



जत पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार १) बंडा ऊर्फ राहुल शिवाजी वाघमारे, रा. निगडी कॉर्नर, जत याचेविरूध्द गर्दी, मारामारी, दुखापत, गंभीर दुखापती, बेकायदेशीर जमाव जमवणे, सावकारी अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
उमदी पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार २) श्रीमंत रामा करपे रा. पांढरेवाडी, ता. जत याचेविरूध्द शस्त्रानिशी गंभीर दुखापत, अपहरण, बेकायदेशीर जमाव जमविणे, बेकायदेशीर शस्त्र घातक जवळ बाळगणे, शासकीय कामात अडथळा करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच ३) नवनाथ आमगोंडा कराडे रा. तिकोंडी, ता. जत याचेविरूध्द खंडणी, अपहरण, दुखापत, गंभीर दुखापत, बंदिस्त जागतून चोरी अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
सदर गुन्हेगारांविरूध्द सन २०१९ ते २०२४ मध्ये शरिराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. नमुद सामनेवाले हे कायदयास न जुमानणारे आहेत. त्यामुळे या गुन्हेगारांविरूध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (अ) (१) अन्वये प्रभारी अधिकारी, जत पोलीस ठाणे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, जत उपविभाग, जत व पोलीस अधीक्षक, सांगली यांचे मार्फतीने उपविभागीय दंडाधिकारी, जत यांना प्रस्ताव सादर केला होता.
उपविभागीय दंडाधिकारी, जत यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन, सुनिल साळुंखे चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, जत विभाग, जत यांचेकडे चौकशी कामी पाठविला. त्यांचा चौकशी अहवाल, गुन्हेगारांविरूध्द दाखल असलेल्या गुन्हयांचा व सद्यस्थितीचा अहवाल, त्यांचेवरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन, सदर शिफारस अहवाल उपविभागीय दंडाधिकारी, जत यांचेकडे पाठविला. उपविभागीय दंडाधिकारी, जत यांनी नैसर्गिक
न्यायतत्वांचा व्यापक विचार करुन जत पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार १) बंडा ऊर्फ राहुल शिवाजी वाघमारे, रा. निगडी कॉर्नर, जत व उमदी पोलीस ठाणे हद्दीतील २) श्रीमंत रामा करपे, रा. पांढरेवाडी, ता. जत व ३) नवनाथ आमगोंडा कराडे, रा. तिकोंडी, ता. जत, जि. सांगली यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५६ (अ) (१) मधील तरतुदीनुसार सांगली जिल्हयाचे हद्दीतुन व सोलापूर जिल्हयातील सांगोला व मंगळवेढा या हद्दीतून ६ महिन्याचे कालावधिसाठी हद्दपार आदेश पारीत केला आहे. आगामी विधानसभा निवडणुका, सण उत्सय या काळात गुन्हेगारांवर बारकाईने नजर ठेवुन त्यांची गुन्हेगारी नेस्तनाबूत करण्यासाठी यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
सदर कारवाईमध्ये मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली, यांचे मार्गदर्शनाखाली सुनिल साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जत उपविभाग, जत. सुरज बिजली, पोलीस निरीक्षक जत पोलीस ठाणे. सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक, स्थागुअ शाखा सांगली, मपोहेकों ४५४ सुनंदा माळी, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, जत. मपोना २१७० वनिता सकट व पोना ४८९ राजेंद्र सावंत, जत पोलीस ठाणे. पोहेकों ६६९ अमोल ऐदाळे व पोकों २२२९ दिपक गट्टे, स्था. गु. अ. शाखा सांगली यांनी काम पाहीले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com