जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन छत्रपती संभाजीनगर यांसकडून महिला पोलीसाचा विशेष गौरव

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

छत्रपती संभाजीनगर

मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर, परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांचे हस्ते महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अमंलदार यांचा गौरव व सुरक्षा मंत्र या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

आज दिनांक 06/03/2025 रोजी जागतीक महिला दिनानिमित्त्ताचे औचित्य साधुन जालना पोलीस दलातर्फे महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा मंत्र या पुस्तकाचे प्रकाशने मा. श्री. वीरेंद्र मिश्र सर विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते करण्यात आले.

महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा मंत्र या पुस्तकामध्ये महिला व बालकांच्या सुरक्षेसंदर्भात कायदयातील तरतुदी, सेल्फ डिफेन्सबाबत माहिती असल्याने सदर पुस्तकाचा समाजातील महिला व बालकांना निश्चितच फायदा होईल असे प्रतिपादन पुस्तकाच्या प्रकाशना दरम्यान मा.श्री.वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

सदर कार्यक्रमा मध्ये जालना जिल्ह्यात विशेष कामगिरी करणारे महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अमंलदार यांचा मा.श्री.वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर, परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांचे हस्ते गौरव करण्यात आला आहे.

  • पोलीस उप निरीक्षक श्रीमती प्रियंका तुपे यांनी केलेल्या खुन या गुन्ह्याचे तपासात आरोपीस जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली मिळाली त्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आहे.

पोलीस उप निरीक्षक श्रीमती दिपाली शिंदे यांनी दरोड्याचे गुन्ह्यात आरोपी कडुन 6 लाख 50 हजार रुपयाचा मुद्देमाल

हस्तगत केल्याने त्यांना प्रशिस्तीपत्र देऊन गौरविण्यात आहे.

पोलीस उप निरीक्षक श्रीमती मंगल सुडके व महिला पोलीस अमंलदार श्रीमती सुमित्रा अंभोरे यांनी केलेल्या अल्पवयीन मुलीचे बलात्कार गुन्ह्यातील आरोपीस 7 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा मिळाल्याने त्यांना प्रशिस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

35 वे महाराष्ट्र पोलीस क्रिडा स्पर्धा 2025 मध्ये जालना जिल्ह्यास व छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांना महिला बॉक्सींग मध्ये 01 गोल्ड मेडल, 02 ब्रॉन्स मेडल प्राप्त झाले बद्दल महिला खेळाडु मपोशि शिल्पा पाजगे, मपोशि पुजा जाधव, मपोशि प्रियंका पवार यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

  • महिला व मुली यांचे सुरक्षा उपाय योजना राबविले बाबत दामिनी पथक जालना येथील पोलीस उप निरीक्षक श्रीमती पुजा कदम, मसफौ उमा घोरपडे, मपोहवा अनिता उईके यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
  • सेल्फ डिफेन्स कार्यक्रम राबविणार श्रीमती ज्योती पवार यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
  • जालना जिल्ह्यात पोलीस काका व पोलीस दिदी संकल्पना राबविले बाबत पोहवा प्रकाश नामदेव सिनकर, पोलीस ठाणे पारध व महिला पोलीस अमंलदार लक्ष्मी वळगे, पोलीस ठाणे तालुका यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमास मा.श्री. विरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर, परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर,

मा.श्री.अजय कुमार बसंल (भापौसे) पोलीस अधीक्षक जालना, मा.श्री. आयुष नोपाणी (भापोसे) अपर पोलीस अधीक्षक जालना, श्री. पंकज जाधव, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना प्रमुख पाहुणे श्री. अग्नीहोत्री प्राचार्य जे.ई.एस. कॉलेज जालना, श्रीमती नाकाडे, बी.ई.ओ जालना, श्रीमती विद्या पटवारी उप प्राचार्य दानकुवर महिला महाविद्यालय जालना, श्रीमती वैशाली सरदार, लिटील एंजन स्कूल जालना, श्रीमती पलक कावळे, लिटील फ्लावर इंग्लीश स्कुल घाणेवाडी, श्रीमती रिटा गोरे, सह्याद्री इंटरनॅशल स्कुल जालना, श्री. केशव फिसके, मुख्याध्यापक बी.पी. उगले इंग्लीश स्कुल जालना, श्रीमती पल्लवी शिंदे मुख्याध्यापक, सनशाईन इंग्लीश स्कूल जालना, श्रीमती म्हसवले शिक्षीका कस्तुरबा गांधी स्कुल जालना, श्री. उदरभरे मुख्याध्यापक लोकमान्य विद्यालय जालना, श्रीमती मानसी मोर (नोपाणी) मानसोपचार तज्ञ मानस हॉस्पीटल जालना, डॉ. दिपक बगडिया, श्री. उदय शिंदे जालना, प्रा. श्री. विनोद जैतमहाल मराठी भाषा तज्ञ, श्री. सुनिलजी रायडा, उद्योजक जालना, जालना, सदर कार्यक्रमाचे नियोजन व संचलन पोअ संजय सोनवणे यांनी केले व जालना शहरातील मराठी व इंग्रजी माध्यमांचे शाळेतील मुली, शिक्षीका व जालना जिल्ह्यातील महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अमंलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट