जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर ८५ किलो गांजा जालना स्था. गुन्हे शाखा व दहशतवाद पथकाने केला जप्त..

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

जालना

03 आरोपी जेरबंद, गांजा व वाहनासह एकुण 28,93,000/- रु. किंमतीचा मुद्येमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखेची कार्यवाही.

मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल सो. यांनी जालना जिल्हयात अंमली पदार्थ विक्री करणारे इसमांविरुध्द कार्यवाही करण्याचे सुचना दिल्या होत्या.

दिनांक 23/04/2025 रोजी जालना शहरातुन छत्रपती संभाजीनगर कडे एका MH/16/AT/8302 या कार मधुन तीघेजण अंमली पदार्थ गांजाची अवैध वाहतुक करणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखा जालना यांनी संयुक्त कारवाई करुन आरोपी नामे 1) विजय अशोक गाढे वय 40 वर्ष रा. शेवगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर 2) अमोल व्दारकादास चांदणे वय 32 वर्ष रा.रुई ता. अंबड जि. जालना 3) बाबासाहेब पंढरीनाथ मुंजवार वय 36 वर्ष रा.भाडर्डी ता. अंबड जि. जालना यांचे ताब्यातुन एकुण 85 किलो 640 ग्रॅम गांजा व गुन्हयात वापरलेले वाहन व 04 मोबाईल असा एकुण 28,93,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोउपनि. बाबासाहेब खार्ड दहशतवाद विरोधी शाखा जालना यांचे तक्रारी वरुन नमूद आरोपी विरुध्द पोलीस ठाणे चंदनझिरा जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे चंदनझिरा हे करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, श्री. अनंत कुलकर्णी उपविपो. अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव सपोनि श्री. योगेश उबाळे, पोउपनि. राजेंद्र वाघ, पोउपनि. बाबासाहेब खाडे, पोउपनि.यासिन, ASI/शेख अख्तर, पोहेकों मारोती शिवरकर, विनोद गडदे, कैलास कुरेवाड ATB जालना, स्था.गु.शा.चे रुस्तुम जैवाळ, रामप्रसाद पव्हरे, गोपाल गोशीक, सतीष श्रीवास, इरशाद पटेल, सचीन राऊत, कैलास चेके, चालक भरत कडुळे, सौरभ मुळे, गणेश वाघ (फोटोग्राफर) यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट