जालना पोलीसानी मोटार सायकल चोर राम गोरे यास केले जेरबंद

जालना
सह संपादक – रणजित मस्के

जालना जिल्हयात मोटार सायकल चोरी करणा-या ईसमाची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बन्सल, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री आयुष नोपाणी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव व पथकास सूचना दिल्या होत्या.
त्यावरुन श्री. पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे पथक तयार करुन कारवाई करण्या बाबत मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने दिनांक 05/04/2025 रोजी पोलीस ठाणे कदीम जालना गुरनं 120/2025 कलम 303(2) गुन्हयामधील चोरीस गेलेली लाल रंगाची बजाज प्लाटीना मोटारसायकल ही अण्णाभाऊ साठे पुतळयाजवळ राहणारा आरोपी नामे राम संजय गोरे याने चोरी केलेला आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाली होती. यावरून आरोपी नामे राम संजय गोरे वय-24 वर्ष, रा. अण्णाभाऊ साठे पुतळयाजवळ, जुना जालना यास ताब्यात घेवुन त्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देवून सदरचा गुन्हा त्यने व त्याचे दोन साथीदारांनी मिळून केला असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीने गुन्हयातील चोरी केलेली मोटार सायकल जीचा चेचीस नं MD2A76AX7LWE14485 इंजिन क्र.PFXWLE61454 ता ते मिळुन आले नाह
सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बन्सल, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकणी यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे पो.नि.श्री.पंकज जाधव, सपोनि श्री उबाळे, पोउपनि श्री राजेंद्र बाघ, पोलीस अंमलदार संभाजी तनपूरे, रामप्रसाद पव्हरे, रमेश राठोड. प्रभाकर वाघ, प्रशांत लोखंडे, रमेश काळे, संदीप चिचोले, सचिन राऊत सर्व स्था.गु.शा. जालना यांनी केली आहे.