जालना पोलीसानी गोवंश चोरी करणारे 2 सराईत गुन्हेगार केले जेरबंद ..

सह संपादक- रणजित मस्के
जालना
त्यांच्या ताब्यातुन रु. 15,51,400/-
रुपयांचा मुददेमाल केला जप्त करुन 22 गुन्हे उघडकीस
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
दिनांक 17/02/2025 रोजी पोलीस ठाणे चंदनझिरा, जालना येथे फिर्यादी नामे अंकुश भिमराव बोरात, वय-39 वर्ष, व्यवसाय-मजुरी, रा. रॉयल नगर, नवीन मोंढा जालना यांनी फिर्यादी दिली की, दिनांक 16/02/2025 रोजी 01.15 वाजेच्या सुमारास त्यांच्या व त्यांच्या शेजारी राहणारे गणेश विठठल घोरपडे व विजयमाला धोंडीराम चव्हाण यांच्या तीन गाई अज्ञात चोरांनी चोरी केल्या असल्याचे कारणावरुन चंदनझिरा पोलीस ठाणे यथे गु.र.क्र.71/2025 कलम 303(2) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदर गुन्हा उघडकीस आणणेबाबत मा. पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव साहेबांनी एक पथक तयार करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुषंगाने गुन्ह्यातील अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदारामार्फत व तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा आरोपी नामे 1) शेख इस्माईल शेख इब्राहिम, वय-28 वर्ष, रा. सिटीएस नं. 91, जाफरनगर, मालेगांव, ता. मालेगांव, जि. नाशिक 2) इस्तेयाक खान अल्ताफ खान, वय-29 वर्ष, रा.घर नं.835, गली नं.07, गुलशेरनगर, मालेगांव, जि. नाशिक यांनी व त्याच्या साथीदारांनी केला असून ते सध्या सिल्लोड येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यांचा सिल्लोड येथे शोध घेतला असता ते मिळून आले असुन उर्वरित 03 आरोपी फरार झ गाले आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपीतांच्या ताब्यातुन गुन्हयात वापरलेली 01 इनोव्हा कार व 03 मोटार सायकल, मोटार रिवायडोंगकामी वापरण्यात येणारे तांबा क्वाईल, तार असा एकुण रु. 15,51,400/- रुपयांचा मुददेमाल करण्यात आला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडे गौवंश चोरीच्या आणखी गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्यांनी जालना जिल्हयातील नंदापुर शिवार, मांजरगाव शिवार, भारज शिवार, डोंगरगाव शिवार, लिंगेवाडी शिवार, टाकळी शिवार, कोठा दाभाडी, संगमेश्वर गव्हाण शिवार, वरुड बुद्रुक शिवार, नांदखेडा शिवार, मोहळाई शिवार, शिपोरा बाजार, म्हसरुळ शिवार, जवखेडा खुर्द, जळगाव सपकाळ शिवार, कुकडी शिवार, जळगाव सपकाळ शिवार, पिंपळगाव शिवार, थिगळखेडा शिवार या ठिकाणाहून रात्रीच्या वेळी जनावरे चोरी केले असल्याचे कबूल दिली असुन एकुण 19 गुन्हे उघडकीस आणले आहे.
तसेच त्यांनी मालेगाव येथुन इनोव्हा कारमध्ये चोरुन आणलेले मोटार रिवायडींगकामी वापरण्यात येणारे तांबा क्वाईल, तार मिळून आले असुन सदरबाबत पोलीस ठाणे तालुका, मालेगांव, नाशिक येथे गु.र.क्र. 141/2025 कलम 331(4), 305(1), 3(5) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल आहे.
तसेच आरोपीतांच्या ताब्यातुन मिळालेली होंडा युनिकॉर्न मोटार सायकल सुध्दा चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर मोटार सायकल पडेगाव येथुन चोरी केली असुन पोलीस ठाणे छावणी, छत्रपती संभाजीनगर येथे गु.र.क्र.36/2025 कलम 303(2) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ व सोबत स्थागुशाचे अमंलदार रामप्रसाद पव्हरे, प्रभाकर वाघ, रस्तुम जैवाळ, गोपाल गोशिक, रमेश राठोड, सागर बाविस्कर, कैलास खाडे, इरशाद पटेल, सतिष श्रीवास, संदीप चिंचोले, रमेश काळे, सचिन राऊत यांनी केली आहे