जालना पोलीस दलाची विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजी नगर परीक्षेत्र यांचेकडुन वार्षिक तपासणी

सह संपादक- रणजित मस्के
जालना
मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजी नगर परीक्षेत्र यांचे वार्षिक निरीक्षण सन २०२४-२०२५ चे अनुषगांणे मा. श्री. विरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजी नगर परीक्षेत्र यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाचे दोन दिवशीय वार्षिक तपासणी केली. वार्षिक तपासणी दरम्यान वेगवेगळे कार्यक्रम, कल्याणकारी व समुदाय (कम्युनिटी) पोलीसींग संबंधीत कार्यक्रमांचे उदघाटण केले.
दिनांक ०६/०३/२०२५ रोजी वार्षिक तपासणी दरम्यान महीला व बाल सुरक्षा जनजागृती अनुषगांने तयार करण्यात आलेले “सुरक्षा मंत्र आधुनिक जगात एक पाऊल पुढे” या पुस्तकाचे विमोचन केले. जालना पोलीस दलाच्या या नाविन्यपूर्ण कल्पनेचे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी कौतुक केले.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखांना भेट देऊन त्यांचे कामकाजाचा आढावा घेतला. लोकोपकारी व तत्परतेने काम करण्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यालयीन कामकाजामध्ये नियमीत सुधारणा करण्या बाबत सुचना दिल्या.
दिनांक ०७/०३/२०२५ रोजी पोलीस मुख्यालय येथे वार्षिक निरीक्षण अनुषगांने परेडचे निरीक्षण केले. दंगा काबु नियंत्रण, बॉम्ब शोधक व नाशक, श्वान पथक, अंगुलीमुद्रा, मोबाईल फॉरेन्सीक व्हॅन व दहशतवादी-आतंकवादी यांना जलदगतीने ताब्यात घेणे या सर्व बाबींचे प्रात्यक्षीकांचे निरीक्षण केले.
पोलीस अधिकारी व अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी यांचे सैनिक सम्मेलन घेऊन अडी-अडचणी बाबत माहीती घेऊन अखत्यारीत असलेल्या समस्यांची जागीच सोडवणुक केली व शासन दरबारी असलेल्या अडचणींचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.





मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पोलीस मुख्यालय येथे मोकळ्या जागेत वृक्षारोपण करुन त्यांचे संगोपण करण्यासाठी सुचना दिल्या. पोलीस वसाहत येथील बाल उद्यानाचे नुतनीकरणाचे उदघाटन केले. अधिकारी व अंमलदार यांचे शारीरीक व मानसिक स्वास्थ सदृढ ठेवण्यासाठी पोलीस मुख्यालय परीसरात असलेल्या व्यायामशाळेचे नुतनीकरणाचे त्यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व शाखा प्रभारी अधिकारी यांचे समवेत गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये गुन्हे, अर्ज, समन्स वॉरन्ट, मुद्येमाल निर्गती, दोषसिध्दी, जप्त वाहणांचा आढावा घेतला. गुन्हयांचे गुणवत्तापूर्ण व मुदतीत तपास पूर्ण करण्याच्या आणि प्रलंबीत गुन्हयांची निर्गती करण्या बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. लोकोपकारी व कायदेशीर कामकाज करण्या बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या.
तसेच मा. मुख्यमंत्री यांचे १०० दिवसीय सात (७ मुद्यांचे अनुषगांने स्वच्छता, सुखर जिवण, कार्यालयीन सोई-सुविधा, नाविन्यपूर्ण उपक्रम, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादीच्या अमलबजावणी करण्याच्या अनुषगांने मार्गदर्शन करुन अमलबजावणी करण्या बाबत सुचना दिल्या.
पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना गुन्हयांची त्वरीत दखल घेणे, त्वरीत गुन्हयाचे घटनास्थळास भेटी देणे व नियमीतपणे गाव भेटी देण्याबाबत आणि सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी यांना आपापल्या उप विभागात देखरेख ठेवण्या बाबत सुवना दिल्या आहेत.
मागील वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी व अंमलदारांचे प्रातिनिधीक स्वरुपात कौतुक करुन प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.