जालना एम आय डी सी भागात लूटमार करणारी 3 जणांची टोळी पोलीस ठाणे चंदनझिरा यांच्याकडून जेरबंद…

सह संपादक -रणजित मस्के
जालना :


जालना शहरातील चंदनझीरा पोलीस स्टेशन हद्दीतील एमआयडीसी भागात दिनांक 17/07/25 रोजी रात्री एका बाहेर राज्यातील कामगाराला खंजीर चा धाक दाखवून, मारहाण करून त्याचा खिशातील मोबाईल बळजबरीने हिसकावुन नेल्याचा गुन्हा दाखल झाला होता, हा गंभीर लुटमार झालेला गुन्हा उघडकीस करणे कामी पोलीस ठाणे चंदनझीरा चे श्री बाळासाहेब पवार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम तयार करून त्यांनी दि 17 व 18 जुलै रोजी जालना शहरातील रेकॉर्डवरील आरोपी (1) विशाल संतोष टाकळकर वय 20. वर्षे, रा नूतन वसाहत जालना (2) विजय अशोक गायकवाड वय 19 वर्ष रा नूतन वसाहत जालना (3) संतोष सुनील आघाम वय 26 वर्ष यांचा गुप्त बातमीदारा मार्फत शोध घेऊन त्यांना अटक करून गुन्हयातील लुटलेले मोबाईल विवो कंपनीचा किंमत अंदाजे 8,000. हजर रुपये, गुन्ह्या करणे करिता वापरलेला एक मोठा खंजिर, गुन्हा करतांना वापरली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटरसायकल किंमत 40,000. हजार रुपये असा एकूण 48,000 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर टोळीकडुन जिल्हयातील ईतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनजीरा पोलीस यांचे पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब पवार पो स्टे ए एस आय श्री मन्सूव वेताळ पो हे कॉ प्रशांत देशमुख, राजेंद्र ठाकूर, कृष्णा तंगे, रविंद्र देशमुख, राजेंद्र पवार, साई पवार, अभिजीत वायकोस, सागर खैरे चालक शेवगण यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पोहेकॉ कृष्णा तंगे हे करीत आहेत.