जालना जिल्हयात हातभट्टी दारुच्या 70 ठिकाणांवर पोलीसांची सामुहिक छापा कारवाई …

सह संपादक -रणजित मस्के
जालना








विशेष मोहिम. एकुण 70 इसमांचे ताब्यातील 40,70,850/-रु. किंमतीची गावठी हातभट्टीची दारु व रसायन जागेवर नाश.
मा.श्री. शहाजी उमाप पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, अतिरीक्त कार्यभार विशेष पोलीस महानिरीक्षक, परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 19/07/2025 रोजी जालना जिल्हा पोलीस घटकामध्ये हातभट्टीची दारु तयार करणाऱ्या ठिकाणांवर मासरेड (सामुहीक छापा कारवाइची विशेष मोहिम) करण्याबाबत आदेशीत केले होते.
दिनांक 19/07/2025 रोजी सकाळी 06:00 वाजता पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल साहेब यांचे मार्गदर्शनाखाली श्री. आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक, जालना, श्री. अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग जालना, श्री. विशाल खांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग, अंबड, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सर्व पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी व इतर पोलीस अधिकारी (40), पोलीस अंमलदार (173) यांनी जालना जिल्हयात हातभट्टीची दारु तयार करणाऱ्या विविध पोलीस ठाणे हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणांवर एकाचवेळी 70 ठिकाणी छापा कारवाई करुन एकुण 4969 लिटर गावठी हातभट्टीची दारु व 33620 लिटर दारु तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल व रसायन, सडवा असा एकुण 40,70,850/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन जागेवर नाश केला असुन 70 इसमाविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.