जालना, बीड, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातुन तडीपार गुंड प्रल्हाद उर्फ पिंटू सुभाष मरकड यास गोंदी पोलीसांकडुन अटक

सह संपादक – रणजित मस्के
जालना
गोंदी पोलीस स्टेशन
दिनांक-04/04/2025
आज दिनांक 04/04/2025 रोजी गोंदी पोलीस स्टेशन हद्दीतील तडिपार ईसम नामे श्री प्रल्हाद उर्फ पिंटू सुभाष मरकड वय 38 वर्षे रा. गोंदी ता. अंबड जि. जालना हा उपविभागीय दंडाधिकारी, उप विभाग अंवड यांचे आदेशान्वये जालना, बीड व छत्रपती संभाजी नगर जिल्हयाच्या नऊ महिने मुदतीकरीता तडीपार केलेले असताना देखील सदर ईसमाने आदेशाचा भंग करुन तडीपारी प्रकरणात परवानगिशिवाय प्रवेश करन गोंदी गावात त्याचे घराचे नजीक आज दिनांक 04/04/2025 रोजी 18.40 वाजेच्या सुमारास वावरताना मिळुन आला. तेव्हा त्यास आम्ही सोबत पोउपनि बलभिम राऊत, पोको दिपक भोजने, पोका / शाकेर सिद्दीकी, पोका / विजय काळे होमगार्ड / भारत जाधव, होमगार्ड / अविनाश मोरे अशांनी ताब्यात घेतले तडीपारी प्रकरणात विनापरवानगी जालना जिल्ह्यातील गोंदी गावात प्रवेश केला म्हणुन त्याचे विरुध्द गोंदी पोलीस स्टेशन येथे सपोनी आशिष श्रीनिवास खांडेकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 142 प्रमाणे प्रल्हाद उर्फ पिंटु सुभाष मरकड वय 38 वर्षे रा. गोंदी ता. अंबड जि. जालना याचेविरुध्द गुन्हा दाखल केलेला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. आशिष खांडेकर, पोउपनि बलभिम राऊत, पोका / दिपक भोजने, पोका/ शाकेर सिद्दीकी, पोका / विजय काळे होमगार्ड / भारत जाधव, होमगार्ड/ अविनाश मोरे सर्व नेमणुक गोंदी पोलीस स्टेशन यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हे पोलीस उपनिरीक्षक पोउपनि बलभिम राऊत हे करित आहेत