जळगाव एम.आय.डी.सी पो.स्टे हद्यीतील फायरींग करणारे गुन्हेगार १५ तासात पोलीसांच्या ताब्यांत…

उपसंपादक-रणजित मस्के
जळगाव:– दिनांक 01/03/2024 रोजी दुपारी 03.30 वाजेच्या सुमारास सोहम गोपाळ ठाकरे वय 18 वर्षे. रा. लक्षमीनगर, मेहरुण जळगाव हा त्यांच्या मित्रासह श्रीराम कंन्याशाळा मेहरुण जवळ उभा असताना दिक्षांत उर्फ दादू देवीदास सकपाळे वय 19 वर्षे, रा. लक्ष्मीनगर, मेहरुण जळगाव व त्याचा मित्र गोपाळ सीताराम चौधरी वय 20 वर्षे, रा. रेणुका नगर, मेहरुण जळगाव असे मोटारसायकलने आले होते तसेच त्यांच्या सोबत दुस-या मोटारसायकलवर दोन अनोळखी तरुण आले होते त्यावेळी जुन्या भाडण्याचा कारणावरुन दिक्षांत सपकाळे व त्यांच्या सोबतच्या तरुणांनी सोहम यास शिवीगाळ केली होती व दिक्षांत याने सोहम यास तुझा मुर्दा पाडतो असे बोलुन त्यावेळी सदर ठिकाणी असलेला त्याचा मित्र गोपाळ याने त्यांच्या कमरेला लावलेला गावठी कटटा दिक्षांत यांच्याकडे देउन दिक्षांत याने सोहम वर जिवे ठार मारण्याचे उददेशाने गावठी कटयांने फायरींग केली होती.
त्यावेळी सोहम सदर ठिकाणावरुन पळुन गेला होता. व भांडण करणारे दिक्षांत सपकाळे व त्याच्यासोबतचे मित्र मोटारसायकलने सदर ठिकाणावरुन निघुन गेले होते सोहम याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यांने त्यांने एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिक्षांत सपकाळे व गोपाळ चौधरी तसेच दोन अनोळखी ईसामांविरुध्द खुनाचा प्रयत्न करणे या सदराखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यांने आरोपी पकडणे बाबत वरीष्ठाच्या सुचना होत्या त्याप्रमाणे आरोपीतांचा शोध सुरु होता. यादरम्यांन मा. पोलीस निरिक्षक श्री बबन आव्हाड सो. यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने दिक्षांत उर्फ दादु देवीदास सपकाळे व गोपाळ चौधरी यांना ताब्यात घेतले होते व त्याच्याकडुन त्यांच्यासोबत असलेले दोन साथीदार यांची नावे निष्पन्न करुन यांना देखील ताब्यात घेतले होते. दिक्षांत त्याच्यावर यापुर्वी 08 गुन्हे दाखल आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री महेश्वर रेडडी सो. मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अशोक नखाते सो. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप गावीत सो. यांच्या मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरिक्षक श्री बबन आव्हाड सो. पोउनि / दिपक जगदाळे, पोउनि / दत्तात्रय पोटे, पोहेकॉ/ किरण पाटील, पोहेकॉ/सचिन मुढे, पोहेकॉ/ गणेश शिरसाळे, किशोर पाटील, योगेश बारी, छगन तायडे, किरण पाटील, ललीत नारखेडे अशांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील सहाय्यक पोलीस निरिक्षक दयानंद सरवदे व पोकॉ/ निलेश पाटील करीत आहे आरोपी यांना अटक करण्यात आली असुन त्यांना उदया मा. न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com