जळगांव स्थानिक गुन्हे शाखेकडून मोटार सायकल चोरी करणारे २ आरोपी जेरबंद १५ मोटार सायकली हस्तगत…

0
Spread the love

प्रतिनिधी- दिप्ती भोगल

जळगांव: जळगाव जिल्हयांत मोटार सायकल चोरीचे गुन्हयांत वाढ झाल्याने मा.एम राजकुमार, पोलीस अधीक्षक सो.जळगाव व मा.श्री.चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, श्री.रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव यांनी श्री. किसनराव नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना त्याप्रमाणे सुचना निर्गमीत करुन मार्गदर्शन केले.
श्री.किसनराव नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना दि.१०/११/२०२२ रोजी गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली आहे की, अडावद ता.चोपडा येथील राहणारा दिपक संजय शेटे व नविद शेख इजाज हे मोटार सायकल चोरी करुन त्याची कमी किंमतीत विक्री करतात अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने श्री.किसनराव नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी त्यांचे अधिनस्त पोहेकॉ.२५ गोरखनाथ बागुल, पोहेकॉ.२७०७ संदिप रमेश पाटील, पोहेकॉ.१४५३ अश्रफ शेख, पोहेकॉ.३१३ संदिप सावळे, पोना.२३०३ प्रविण मांडोळे, पोना.१५८८ परेश महाजन, पोना.२९९३ रविंद्र पाटील, पोकॉ.१४५४ लोकेश माळी चापोहेकॉ.४३६ भारत पाटील, चापोकॉ.२२८९ प्रमोद ठाकूर अशांचे पथक तयार करुन त्यांना अडावद ता.चोपडा येथे रवाना केले असता पथकाने आरोपी नामे दिपक संजय शेटे वय २० रा. प्लॉट भाग, अडावद ता. चोपडा, २)नविद शेख इजाज वय २३ रा.मनियार अळी, अडावद ता.चोपडा जि.जळगांव यांना सापळा लावून शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यात असलेल्या मोटार सायकल संदर्भात विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना ताब्यात घेऊन सखोल विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही चोपडा, अमळनेर, यावल, धुळे जिल्हयातील शिरपूर, थाळनेर व मध्यप्रदेश राज्यातील बलकवाडा जि.खरगोन येथून मोटार सायकल चोरी केलेल्या आहेत. सदर आरोपीतांनी चोरी केलेल्या १४ गुन्ह्यांमधील एकूण १५ मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत त्या खालीलप्रमाणे, १)चोपडा शहर पोलीस स्टेशन गुरनं.३४३/२०२२ भादंवि.क.३७९

२)चोपडा शहर पोलीस स्टेशन गुरनं.४४७/२०२२ भादंवि.क. ३७९

३)चोपडा शहर पोलीस स्टेशन गुरनं.४४९/२०२२ भादंवि.क.३७९

४)चोपडा शहर पोलीस स्टेशन गुरनं.४५४२०२२ भादंवि.क.३७९

५)चोपडा शहर पोलीस स्टेशन गुरनं.४५२/२०२२ भादवि.क.३७९

६)अमळनेर पोलीस स्टेशन गुरनं.५१३/२०२२ भादवि.क.३७९

७) यावल पोलीस स्टेशन गुरनं.४५६/२०२२ भादवि.क.३७९

८)शिरपुर पोलीस स्टेशन गुरनं.५७०/२०२२ भादवि.क.३७९

९)शिरपुर पोलीस स्टेशन गुरनं.४९६/२०२२ भादंवि.क.३७९

१०) शिरपुर पोलीस स्टेशन गुरनं.४९८/२०२२ भादंवि.क.३७९

११) शिरपुर पोलीस स्टेशन गुरनं.५४१/२०२२ भादंवि.क.३७९

१२) शिरपुर पोलीस स्टेशन गुरनं.५४०/२०२२ भादंवि.क.३७९

१३) शिरपुर पोलीस स्टेशन गुरनं.२९३/२०२२ भादंवि.क.३७९

१४) थाळनेर पोलीस स्टेशन गुरनं.३६/२०२२ भादंवि.क.३७९

वरील प्रमाणे ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही आरोपीतांना पुढील कायदेशीर कारवाईकामी मुद्देमालासह ताब्यात देण्यात आल्याचे श्री. किसन नजनपाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यानी सांगितले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट