दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने घातक शस्त्र बाळगणाऱ्याच्या जळगांव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…

उपसंपादक-रणजित मस्के

जळगांव : दिनांक 19 मे 2023 रोजी मा.एम. राज कुमार सो., पोलीस अधीक्षक सो. जळगाव, मा. श्री. चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्री. रमेश चोपडे, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना गुप्त बातमी मिळाली की, कंडारी गावी ता. भुसावाळ येथील मयुर नारायण मोरे याचे राहते घरी येथे विना परवाना बेकायदा गावठी पिस्तोल मॅगझ गीन, काडतुसाहर तलवारी बाळगून दहशत निर्माण करीत असले बाबत बातमी मिळाली असल्याने मा. पोलीस निरीक्षक श्री किसन नजनपाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखे कडील पोलीस उप निरीक्षक श्री गणेश वाघमारे, सहा. पोउनि अनिल जाधव पोह कमलाकर बागुल, अनिल देशमुख, जयंत चौधरी, महेश महाजन, दिपक पाटील, पोना श्रीकृष्ण देशमुख, मेहश सोमवंशी, इश्वर पाटील, सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव अश्यांचे पथक नेमण्यात आले होते.

मा. श्री. किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी व वरील पथकाने गोपनीय माहितीचे आधारे हतनुर ता. भुसावळ जि. जळगाव येथून मयुर नारायण मोरे वय २६ व कल्पेश राजु मोरे वय २२ वर्षे, रा. कंडारी ता. भुसावळ जि. जळगाव हे अवैध रित्या गावठी पिस्तोल मॅगझीन काडतुसह ०५ तलवारी सह मिळून आल्याने पुढील कारवाई करीता वरणगाव पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यानी सांगितले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com