जळगांव येथील जिल्हापेठ पोलीसांची मोठी कामगिरी चोरीच्या ०७ दुचाकी केल्या हस्तगत…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

जळगाव :– आम्ही जेव्हा जिल्हापेठ पोलीस ठाणेचे कार्यभार हाती घेतला, त्यावेळेस मोटार सायकल चोरीचे प्रमाणे जास्तीचे होते. तेव्हापासुन आम्ही मोटार सायकल चोरीच्या ठिकाणी स्वतः भेट देवुन, आजुबाजुचे सि सि टी व्ही फुटेज चेक करणे, प्रत्येक मोटार सायकल चोरीच्या घटनास्थळाचा डम्पडेटा घेवुन, त्यावर अभ्यास करणे, असे असतांना एकच नंबर वारंवार येत असल्याने, तसेच ब-याच ठिकाणी अंगकाठी सारखा असलेला इसम हा सि सि टी व्ही फुटेज मध्ये दिसुन येत असल्याने, आम्ही आमचे गुप्त बातमीदार पेरुन, सदर संशयीत इसमाचा शोध घेतला असता, सदरचा इसम हा रावेर तालुक्यातील वाघोदा येथील असल्याचे समजले. त्यानंतर वाघोदा गांवी विचारपुस करता, सदरचा इसम मागील ०१ वर्षापासुन गांवात राहत नसल्याचे समजुन आले.

त्यानंतर आम्ही डम्पडेटा मध्ये आलेला क्रमांकाचा सि डी आर काढता त्यामध्ये एक संशयीत नंबर दिसुन आला, त्या नंबरचा सि डी आर घेता सदरचा नंबर हा एका महीलेचा असल्याचे समजले. त्यावरुन आरोपी याचा चालु नंबर मिळवुन, त्या नंबरचा सि डी आर घेता सदरचा इसम हा काल जळगांव शहरात आल्याचे समजल्याने त्यास अजिंठा चौकातुन ताब्यात घेवुन, त्यास विचारपुस करता त्याने चोरलेल्या ०६ मोटार सायकली काढुन दिलेल्या आहेत. सदरचा आरोपी हा गुरन ६३२/२०२२ भादवी कलम ३७९ या गुन्हयात अटक आहे. तसेच आरोपी याने एम आय डी सी परीसरातुन चोरुन नेलेली मोटार सायकल क्रमांक एम पी १२ बी सी ३१८८ ही त्याने जळगांव शहर रेल्वे स्थानक परीसरात सोडुन दिल्याची कबुली दिल्याने सदरची मोसा जळगांव शहर पोलीस ठाणे येथे लावण्यात आलेली आहे.

आरोपीताचे नांव-राकेश पंडीत भाट वय-२४ रा. मोठे वाघोदा ता. रावेर ह.मु. अयोध्या नगर सिध्देशवर मंदीराचे मागे, एम आय डी सी जळगांव

१] २०,०००/- रु. किं ची होंडा शाईन कंपनीची मोसा एम एच १९ सीएम १९२८ पोस्टे जिल्हापेठ गुरन ६३२/२२

२] ३०,०००/- रु. किं ची होंडा शाईन कंपनीची मोसा एम एच १९ डी एल ०८९१ पोस्टे जिल्हापेठ गुरन ५९८/२२

३] २५,०००/- रु. किं ची मोसा एम एच १९ डी क्यु ६६५७

४] ३५,०००/-रु. किं ची होंडा कंपनीची स्प्लेंडर एम एच १९ ए आर ४५७२

५] ३५,०००/- रु. किं ची होंडा कंपनीची स्प्लेंडर एम एच १९ ए आर ८५५८ पोस्टे भुसावळ शहर गुरन २३/२३ पोस्टे जिल्हापेठ गुरन ३६७/२३ पोस्टे एमआयडीसी गुरन ७४५/२२

६] २०,०००/-रु. किं ची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर एम एच ०६ पी ४२८६ तसेच जिल्हापेठ पोलीस ठाणे गुरन ४१३/२०२३ भादवी कलम ३७९ या गुन्हयाचे तपासात गोपनिय माहीतीच्या आधारे सि सि टी व्ही मध्ये दिसत असलेला आरोपी नामे विशाल मुरलीधर दाभाडे वय-२३ रा. रामेश्वर कॉलनी जळगांव हा मिळुन आल्याने त्यास अटक करण्यात आलेली असुन, त्याचेकडुन १५,०००/- रु. किं ची बजाज डिस्कव्हर कंपनीची मोसा क्र. एम एच १९ ए वाय ९९१७ हि जप्त करण्यात आलेली आहे.
एकुण मुददेमाल- १,८०,०००/- रुपये किंमतीच्या ०७ दुचाकी

पोलीस अधिक्षक, डॉ. एम राजकुमार, मा. अपर पोलीस अधिक्षक, अशोक नखाते, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावित, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ. २५३४ सलीम तडवी, पोना. ३०८७ जुबेर तडवी, पोकॉ. ३२५७ अमितकुमार मराठे, पोकॉ. रविंद्र साबळे, पोकॉ. तुषार पाटील हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट