जळगाव जिल्हा पोलीस आणि जळगाव सोसायटी ऑफ क्रिटीकल केअर मेडिसिन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर संपन्न…
प्रतिनिधी-रणजित मस्के
जळगांव: जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री एम राज कुमार यांच्या संकल्पनेतून, जळगाव जिल्हा पोलीस आणि जळगाव सोसायटी ऑफ क्रिटीकल केअर मेडिसिन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार व त्यांच्या परीवाराकरिता आज दिनांक २२-११-२०२२ रोजी आरोग्य शिबीर घेण्यात आले शिबिराचा 270 पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार व त्यांचे परीवाराने लाभ घेतला. शिबिरात सर्वाचे रक्तदाब, शुगर, ECG करून घेण्यात आले त्या दरम्यान ज्यांना त्रास असल्याचे निर्दार्षानास आले.


त्यांना जळगाव सोसायटी ऑफ क्रिटीकल केअर मेडिसिनचे डॉक्टर्सनी पुढील औषधोपचारासाठी मार्गदर्शन केले.
या वेळी मा. अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी यांनी त्यांचे कौतुक करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आणि जळगाव सोसायटी ऑफ क्रिटीकल केअर मेडिसिनचे नामवंत डॉक्टर्स ,डॉ. राजेश डाबी, डॉ. राहुल महाजन, डॉ. सुनील सूर्यवंशी, डॉ. रविद्र पाटील, डॉ. लीना पाटील, डॉ. अभय जोशी, डॉ. गुणवंत महाजन, डॉ. स्वप्नील चौधरी, डॉ. कल्पेश गांधी, डॉ. सुयोग चौधरी, डॉ. नेहा भंगाळे, डॉ. गणेश भारुडे यांनी उपस्थित अधिकारी, अंमलदार व त्यांचे परीवारास निरामय आरोग्य बाबत मार्गदर्शन केले.



या वेळी राखीव पोलीस निरीक्षक श्री संतोष सोनवणे, सहा. पोलीस निरीक्षक सौ. सुनंदा पाटील, राखीव पोलीस उप निरीक्षक श्री पवार, है उपस्थित होते. आणि सहा. फौ. श्री रावसाहेब गायकवाड, पोह. सतीश देसले, पोह, संजय पाटील, पोना. जितेंद्र चौधरी, चंद्रसिंग राजपूत, सर्व पोलीस प्रशिक्षक यांनी शिबीर संपन्नतेसाठी परिश्रम घेतले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com