चोरीच्या मोटार सायकलचा वापर करून जबरीने मोबाईल हिसकवणारा इसम जेरबंद

0
WhatsApp Image 2023-08-13 at 6.27.20 PM
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

नाशिक

नाशिक शहरातील मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी मा. पोलीस आयुक्त सो., मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे यांनी सुचना व मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोलीस अधिकारी व अंमलदार सदर

गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना, दिनांक १०/०८/२०२३ रोजी पो. अं. २१५४ राहुल पालखेडे यांना गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने बातमी मिळाली की, गंगापुररोड परिसरात एक इसम चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी एका काळ्या रंगाच्या मोटार सायकलवर येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली व सदरची माहीती वपोनिरी. श्री. विजय क्रमाळ सो. यांना कळविली असता, वपोनिरी. श्री. विजय ढमाळ सो. यांनी सपोनि / हेमंत तोडकर, पोहवा / १०९ प्रविण वाघमारे, पो.ना. १९०० / विशाल देवरे, पोना / १८८३ विशाल काठे, पो अं. / १४०५ आप्पा पानवळ, पोअं/ २२७३ | अमोल कोष्टी अशांचे पथक तयार करून मिळालेल्या बातमीवरून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्याअनुषंगाने वरील नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे गंगापुर परिसरात सापळा लावुन एका इसमास जागीच पकडुन ताब्यात घेतले. त्यास त्यांचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नावे अनिकेत पप्पु शार्दूल, वय १८, मुळ रा. वाघेरा ता. अंबक जि. नाशिक हल्ली रा-आंबेडकर पुतळयाचे जवळ चाळे किराण्या स्टोअरचे शेजारी, गोवर्धन गंगापुरगाव नाशिक असे सांगुन त्याचे कडुन चोरीचे मोबाईल व चोरीची प्लसर मोटार सायकल मिळुन आल्याने ती जप्त करण्यात आली व त्यास ताब्यात घेवुन गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने व त्याचा साथीदार यांनी नाशिक शहरात विविध ठिकाणी रस्त्याने जाणा-या इसमांचे मोबाईल बळजबरीने हिसकावले असुन व काळया रंगाची प्लसर चोरी केल्याची कबुली असुन त्याचेकडून एकुण ८ मोबाईल व एक काळ्या रंगाची प्लसर असा एकूण ०१,०३,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून मुंबईनाका पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुरनं २१३ / २०२३ भादवि कलम ३९२, ३४ हा गुन्हे उघडकीस आले असुन आरोपीतांना पुढील कारवाई कामी मुंबईनाका पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.

सदर कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो, श्री. अंकुश शिंदे सो. मा. पोलीस उप आयुक्त सो. गुन्हे, प्रशांत बच्छाव ससो. मा. सहा. पोलीस आयुक्त सो. डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, सपोनि / हेमंत तोडकर, पोउनि / विष्णु उगले, पोहवा. प्रवीण, वाघमारे, महेश साळुंके, विशाल देवरे, विशाल काठे, प्रशांत मरकड, राहुल पालखेडे, राजेश राठोड, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे अशांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट