जगातील सर्वश्रेष्ठ दान म्हणजे विद्यादान – श्री विलासजी तांबे

राजापूर :






सह संपादक -रणजित मस्के
या जगात सर्वश्रेष्ठ दान असेल तर ते म्हणजे विद्यादान, कारण एखाद्याला एका वेळेचे जेवण उपलब्ध करून देण्यापेक्षा आयुष्यभर अन्न मिळवण्याचे ज्ञान देणे कधीही सर्वोत्तम असते असे प्रतिपादन ओम विजय नवजिवन महाराज ट्रस्ट, मुंबईचे संस्थापक अध्यक्ष विलास तांबे यांनी राजापुर येथे केले.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील कारशिंगे, उपळे, माहुळांगे, जुआटी, प्रिंडावन येथील गोरगरीब कुटुंबातील गरजु, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या व पुस्तके वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाप्रसंगी उपसंस्थापक सौ विलासणी विलास तांबे, सचिव सुनिल सावंत, महासचिव. ओमकार तांबे, मेडीकल को ऑर्डिनेटर जितेंद्र पाटील तसेच उदय भास्कर, तानाजी आपटे, आणि शिक्षक वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वतः प्रत्येक ठिकाणी जाऊन विद्यादान करणे जरी शक्य नसले तरी विद्यार्जनाकरीता आवश्यक साहित्य पुरवुन विध्यार्थ्यांना प्रगतीकडे नेण्याचा आमच्या संस्थेचा मानस आहे.आमच्या संस्थेकडून अशाच प्रकारचे विविध कार्यक्रम जसे की आरोग्य शिबिरे राबविणे, गोर गरीब गरजु रुग्णांना मदत करणे यासारखे उपक्रम दर वर्षी राबवुन सर्वांगिण विकास साधण्यासाठी प्रयत्न केले जातात असे तांबे यांनी त्याच्या अध्यक्षीय भाषणात म्हटले.
तसेच आपणा सर्वांनी आमचा सन्मान केला व आमच्या संस्थेला हे समाज उपयोगी कार्य करून देशाच्या प्रगतीला हातभार लावण्याचे पुण्यकर्म करण्याची संधी दिली त्यासाठी आभार शाळेचे व ग्रामस्थांचे आभार मानले.
सदर कार्यक्रम समाजाची जाणीव असलेल्या संस्था व व्यक्तीचं आयोजित करू शकतात असे ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त करतांना म्हटले.
विलास तांबे यांचे या उपक्रमाचे सार्वजनिक स्तरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे.