जळगाव येथे सोन साखळी चोर परतवाडा पोलीसांचे जाळयात

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

जळगाव

दिनांक ०७/०४/२०२५ रोजी सायंकाळी ०७/०० वा. चे सुमारास फिर्यादी सौ. कीरण कैलास शर्मा वय ६४ वर्ष रा. ब्राम्हणसभा कॉलनी परतवाडा हे वाघामाता मंदीरावरून दर्शन घेवुन घरी परत येत असतांना फिर्यादी हे त्यांचे घराचे वॉल कंम्पाउंडचे गेट उघडत असता फिर्यादी जवळ एका मोटार सायकलवर दोन अनोळखी ईसम व मोटर सायकल चालवीणारे इसमाने त्याचे हातातील मोबाईल दाखवुन आन्टी यह पता कहा का है असे म्हणाला तेवढ्यात मोटर सायकलवर मागे बसलेला इसमाने फिर्यादीचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र पोत वजन १८.७५० ग्रॅम किंमत अंदाजे १,१७,४५० रूपये असलेली बळजबरीने ओढुन मोटर सायकल घेवुन जोराने पळुन गेले. अश्या फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून अपराध क्रमांक २८३/२०२५ कलम ३०९ (४), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदर गुन्हयाचे तात्रीक व गोपनीय माहीतीचे आधारे तपास करत असतांना सदर गुन्हयातील आरोपी हे भुसावळ येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयाचे तपासात भसावळ येथे जावुन संशयीत आरोपी मजरह अब्बास जाफर ईराणी वय १९ वर्ष रा. पापानगर भुसावळ यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने कबुली दिली की, दिनांक ०७/०४/२०२५ रोजी सायंकाळी ०७/०० वा. दरम्यान “मी व माझा मित्र हसनेन अली जाफर अली इराणी वय २८ वर्ष रा. मुस्लिम कॉलनी भुसावळ जिल्हा जळगाव असे परतवाडा येथे एका काळया रंगाच्या विना नंबर प्लेट पल्सर गाडीने आलो होतो व परतवाडा शहरात एका महीलेल्या गळयातील सोन्याची पोत हिसकावुन नेली होती. त्यावेळी हसनेन अली हा मोटर सायकल चालवत होता व मी पाठीमागे बसलो होतो. त्या महीलेल्या गळयातील पोत मी ओडली होती.” सदर विना नंबर बजाज पल्सर मोटर सायकलची चेचीस नंबर वरून सदर मोटर सायकलची नंबर चेक केले असता त्याचा MH 19 DB 0476 असा दिसुन आला. सदर मोटर सायकल चोरी बाबत पोलीस स्टेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे १३१/२०२५ कलम ३०३ (२) भा. न्या. सं. अन्वये गुन्हा नोंद असल्याचे दिसुन आले. वरून मजरह अब्बास याचे ताब्यातुन सदर गुन्हयात वापरलेली वर नमुद मोटर सायकल जप्त करण्यात आली.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक विशाल आनंद, मा. अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, मा. सहायक पोलीस अधिक्षक उपविभाग अचलपुर डॉ. शुभम कुमार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश म्हस्के ठाणेदार परतवाडा, स.पो.नि. युवराज रबडे, पो.हे.कॉ. सचिन होले ब.नं. ८३, पो.कॉ. विवेक ठाकरे ब.नं. ३४३, पो. कॉ. शुभम शर्मा ब.नं. ७६७, पो. कॉ. घनशाम किरोले ब.नं. २३९१, पो. कॉ. जितेश बाबील ब्र.नं. २४४१, पो.कॉ. योगेश बोदुले ब.नं. १२४, पो. कॉ. सचिन कोकणे ब.नं. २३५४ यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट