जळगाव पोलीसांनी सायकल चोराकडुन चोरीचे दोन सायकली केल्या हस्तगत

जळगाव
सह संपादक रणजित मस्के

एम आय डी सी पोस्टेला सिसिटीएनएस नं. 390/2025 बि एन एस अॅक्ट कलम-303 [2] प्रमाणे सायकल चोरी बाबत गुन्हा दाखल झाला असुन सदर गुन्हांतील फिर्यादी नामे गजेंन्द्र कुमार चुडामण महाजन वय-45, धंदा-पेशनर रा. जय मातादी अपार्टमेन्ट एफ-4, मोहाडी रोड, आदर्शनगर जळगाव यांच्या मुलाने दिनांक 27.05.2025 रोजी 12.00 ते 02.00 वाचे सुमारास जळगाव शहरातील गायत्रीनगर, शिरसोली रोड येथे सायकल लावुन घरी आला होता तेव्हा पुन्हा त्याठिकाणी सायकल घेणेसाठी गेला असता सदर ठिकाणी मिळुन न आल्याने अज्ञात इसमा विरुध्द सायकल चोरी बाबत दिनांक 27.05.2025 रोजी 21.04 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हांत मा. पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील सो., एम आय डी सी पोस्टे यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरुन आरोपी नामे जयेश अशोक राजपुत वय 19 रा. मयुर कॉलणी, पिंप्राळा जळगाव यास दिनांक 28.05.2025 रोजी 01.15 वाजता जळगाव शहरातील मयुर कॉलणी पिंप्राळा भागातुन ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचे कडुन खालील वर्णनाची व किंमतीची सायकल जप्त करण्यात आलेले आहे.
जुवाकिंअ. 1]11,000/- रु किंची एक लाल रंगाची NEW SPEED MSFSDDMW कंपनीची सायकल
2]15,000/- रु किंची एम सिल्वर रंगाची HUGE कंपनीची 27.5 कंपनीची सायकल जुवाकिअं
26,000/- एकुण
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री डॉ. महेश्वर रेड्डी सो., जळगाव व मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री अशोक नखाते सो., तसेच मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री संदीप गावित सो., जळगाव भाग जळगाव व मा. पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील सो., यांच्या मार्गदर्शनखाली पो उप निरी राहुल तायडे, पो उप निरी चंद्रकांत झनके, पोना विकास सातदिवे, योगेश बारी, पोकों मंदार महाजन व पोकॉ इज्जाईल खाटील अशानी केली आहे. गुन्हाचा तपास पोना विकास सातदिवे करीत आहेत.