जादुटोणा करुण घरामधुन गुप्तधन काढणयाचे आमिष दाखवुन फसवणुक करणारा भोंदु बाबा अयोध्याप्रसाद गिरी काशिगांव पोलीसांच्या जाळयात…

उपसंपादक : मंगेश उईके
मिरा रोड

तक्रारदार नांमे रुपाली संजय निराटकर, वय ३५ वर्षे, व्यवसाय घरकाम, राहणार, जनता नगर झोपडपट्टी, ढवळे चाळ, काशिगाव, मिरारोड पूर्व, ता. जि.ठाणे. यांनी दिनांक ०१.०७.२०२५ रोजी तक्रार दिली कि, एप्रील २०२५ मध्ये तक्रारदार यांच्या राहत्या घरा समोर अयोध्याप्रसाद गिरी नावाचे महाराज भाड्याने राहण्याकरीता आले होते त्यांच्याशी त्यांची ओळख झाल्यानंतर त्यांनी तक्रारदार यांना त्यांचे पती व त्यांचे भाउ यांची दारु सोडविण्याचे औषध देतो तसेच त्याला तंत्रमंत्र विद्या अवगत असुन तो भुतप्रेत लागीर, बाथा झालेल्या लोकांवर उपचार करुण यांतुन मुक्तता करतो असे सांगुन अयोध्याप्रसाद गिरी महाराज याने तक्रादार यांचा विश्वास संपादन केला होता.
महाराज आयोध्याप्रसाद याने तक्रारदार यांना सांगितले कि, ” तुम्हारे पती को जिन लगा है वो आठ दिन में मरने वाले है।’ त्याकरीता पुजा घालावी लागेल तरच तो जगेल अशी भिती घातली होती. यासाठी पुजे करीता ५.००,०००/- रूपये खर्च व घरातील व नोतेवाईकाकडील असलेले सोन्याचे दागिने एकत्र करून पुजा करावी लागेल असे सांगीतले होते.
दिनांक १४.०५.२०२५ रोजी रात्री आयोध्याप्रसाद महाराज राहत असलेल्या चाळितील रूम नं. ०५ येथे रात्री ०८.०० वा. सुमारास तक्रारदार व त्यांचे पती तेथे गेल्यावर आयोध्याप्रसाद गिरी याने त्याच्या रूममध्ये पुजा मांडली होती. पुजा करतेवेळी महाराज मंत्र उच्चार करत होता व त्याच्या आंगामध्ये देव आला असल्याचे फिर्यादी यांना भासवत होता. त्यावेळी आयोध्याप्रसाद याने फिर्यादीस सांगितल्याप्रमाणे फिर्यादी यांनी त्यांचे पतीचा जीव वाचावा व त्यांच्या भावाची दारू सुटेल या आशाने फिर्यादी यांनी आयोध्याप्रसाद याला २,७०,०००/- रूपये इतकी रक्कम जमवून व घरातील सर्व महिलांचे एकुण ८४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने एकत्रीत करून काळ्या कपड्यामध्ये बांधुन आयोध्याप्रसाद यांच्याकडे दिले. त्यानंतर आयोध्याप्रसाद याने फिर्यादीस सांगितले कि, डब्यामध्ये सोने व रोख रक्कम ठेवली आहे तो डब्बा ४५ दिवसानंतर उघडावा त्याचे अगोदर उघडल्यास तुमचे सोने व पैसे गायब होतील व मंत्र उपचाराचा उपयोग होणार नाही. तसेच सदर रूम ही ४५ दिवस बंद राहील मी पुढील पुजा करण्याकरीता माझ्या गूरुस्थानी जाणार असुन रूममध्ये प्रवेश करावयाचा नाही असे सांगुन मी ४५ दिवस झालेनंतर ह्या ठिकाणी प्रकट होवुन व पुजा केलेले सोन्याचे दागीने व रोख रक्कम परत देईन ते सोन्याचे दागीने ज्यांचे आहेत त्यांनी घातल्यांनतर तुमच्या मागील सर्व पिडा पितृदोष, भुत पिशाच यांचा नाश होवुन तुम्हाला सुख समृद्धी लाभेल असे सांगुन आयोध्याप्रसाद गुरुकडे जातो असे सांगुन निघुन गेला होता. काही दिवासांनी फिर्यादी यांनी आयोध्याप्रसाद महाराज याच्यावर संशय आल्याने त्यांनी रुममधील डब्बा उघडुन तपासला असता डब्यामध्ये फिर्यादी यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळुन आली नाही. त्यावेळी त्यांची खात्री झाली कि, आयोध्याप्रसाद गिरी याने फिर्यादीस जादुटोणा करुण गुप्तधन काढुन देतो व दारु सोडुन देतो असे आमिष दाखवुन फिर्यादी यांची फसवणुक केली आहे. फिर्यादी यांच्या तक्रारी वरुण काशिगांव पोलिस स्टेशन येथे आयोध्याप्रसाद गिरी यांच्या विरुद्ध गु.र.नं २८९/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४), ३१६ (२) सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३(२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
नमुद गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने वरिष्ठांनी आयोध्याप्रसाद गिरी महाराज याचा शोध घेवुन त्याच्यावर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्या प्रमाणे काशिगांव पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तपास करुन आयोध्याप्रसाद गिरी महाराज यांस तुर्भे, नवी मुंबई येथुन ताब्यात घेतले असता व त्याच्याकडु केल्या चौकशीतुन त्याचे नांव सुनिलकुमार पातीदास ऊर्फ अयोध्याप्रसाद, वय ४८ वर्षे, सध्या रा. रुम नं.०५, जनता नगर झोपडपट्टी, विजय ढवळे चाळ, काशिगाव, मिरारोड पुर्व, मुळ रा. करईयन पुरा, चिरगांव (रुरल), झाँसी, उत्तर प्रदेश-२८४३०१ असे असल्याचे निष्पन्न झाले असुन आयोध्याप्रसाद गिरी असे बनावट नाव धारण करुण तो मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर इत्यादी दाटवस्तीच्या ठिकाणी रुम भाड्याने घेवुन त्या ठिकाणी अश्याच प्रकराच्या फसवणुक करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपी सुनिलकुमार पातीदास ऊर्फ अयोध्याप्रसाद अटक करण्यात आली असुन त्याच्याकडुन ९४,००० / रुपये रोख रक्कम व १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच गुन्हा करण्याकरीता वापरण्यात आलेले साहित्य, काळे कपडे व पुजा अर्चाचे संबंधित साहित्य इत्यादी हस्तगत करण्यात आले असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय पुजारी हे करत आहे.
सदरची कामगिरी श्री. प्रकाश गायकवाड, पोलिस उप आयुक्त परिमंडळ ०१, डॉ विजय मराठे, सहाय्यक पोलिस आयुक्त, मिरारोड विभाग, महेश तोगरवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, काशिगांव पोलिस स्टेशन, संजय पुजारी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अभिजीत लांडे, राणा परदेशी, पोलिस उप निरीक्षक, गुन्हे प्रकटीकरण शाखा, तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पो.हवा/प्रताप पांचुदे, पो.हवा सचिन पाटिल, पो.शि विक्रांत खंदारे, पो.शि. उमंग चौधरी, पो शि. किरण विरकर, पो.शि. टोबर, पो.शि. रविन्द्र सोनावणे, पो.शि. नामदेव देवकाते, पो.शि/अभिषेक मढावी यांनी केली आहे.