जबरी चोरी करणारा इसम ०१ तासाच्या आत अंबड पोलीसांच्या ताब्यात गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ठ कामगिरी

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

नाशिक :- अंबड पोलीस ठाणे येथे श्री रंगनाथ बबनराव माळवे वय ७८, धंदा- सेवानिवृत्त, रा- एन ४२, सीए २/१/३, नवनाथ हार्डवेअर समोर त्रिमुर्ती चौक, सिडको नाशिक हे पोस्ट ऑफिस पाटील नगर, सिडको नाशिक येथुन त्यांची पेन्शन काढुन रस्त्याने पायी जात असतांना त्यांच्या हातातील पिवळ्या रंगाची पिशवीमधील ३०००० /- रू रोख रक्कम एक मोबाईल असा ३५०००/- रूपयांचा मुद्देमाल एका इसमाने मोटारसायकल वर येवुन बळजबरीने हिसकावुन घेवुन चोरी करून निघुन गेला त्यावरून अंबड पोलीस ठाणे येथे । गुरनं ३८९ / २०२३ भादविक ३९२ प्रमाणे दिनांक २७/०६/२०२३ रोजी २०:२४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर घटनास्थळावरील प्राप्त फुटेजच्या आधारे गुन्हे शोध पथकातील पोशि १५६६ सागर जाधव यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, फुटेज मधील इसम हा अंबड पोलीस ठाणेहददीतील सावतानगर सिडको नाशिक या भागातील असुन त्याचा गुन्हे शोध पथकाचे सपोनि / वसंत खतेले, पोना १८४८ किरण गायकवाड, पोशि २३९१ संदिप भुरे, पोशि २३६१ अनिल ढेरंगे, पोशि २२२९ घनश्याम भोये, पोशि ९३० राउत यांनी शोध घेवुन सापळा रचुन सदर इसमास ताब्यात घेवुन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जबरी चोरी केल्याची कबुली दिली. सदर इसमाचे नाव खुशाल शरदचंद्र मोरे वय १९, रा- एन ४२ / जे ई- १/२६/१, सावतानगर, सिडको, नाशिक असे असुन त्यास सदर गुन्हयात अटक करून त्याचेकडुन एकुण ३५,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त श्री चंद्रकांत खांडवी, परिमंडळ – ०२, सहा पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख, अंबड विभाग तसेच अंबड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री श्रीकांत निंबाळकर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास सपोनि वसंत खतेले व पोशि २३६९ ढेरंगे हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट