जबरी चोरीतील फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराला पकडण्यात पालघर पोलीसांना यश..!

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर

तलासरी पोलीस ठाणे हद्दित दिनांक २०/०४/२०२५ रोजी १२.३० वा. ते १८.०० वा. च्या दरम्यान उपलाट-कलबटपाडा, ता. तलासरी, जि. पालघर येथून फिर्यादी नामे संदिप भैयालाल पारधी, वय ३८ वर्षे, रा. एकता नगर, वाडा-ऐनशेत रोड, ता. वाडा, जि. पालघर हे त्यांचे ताब्यातील मारुती सुझुकी कंपनीची स्विप्ट डिझायर गाडी क्र. MH48-CT-7578 हीमध्ये जात असताना उपलाट कलबटपाडा येथे थांबले असता तीन अज्ञात आरोपीतांनी आपसांत संगनमत करून फिर्यादीच्या गाडीसमोर मोटार सायकल आडवी लावुन फिर्यादी यांना जबरदस्तीने त्यांच्या कारमध्ये पाठिमागे बसवून त्यांचे अपहरण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व हातातील सोन्याची अंगठी व रोख रक्कम असा माल जबरीने काढून घेवून फिर्यादीस कल्याण बायपास, ता. भिवंडी, जि. ठाणे येथे उतरवून कारसह वर नमूद मुद्देमाल जबरी चोरी करुन नेला. त्याबाबत अज्ञात आरोपींविरुध्द तलासरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ५७/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०९ (४), १४०(३) प्रमाणे दिनांक २२/०४/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान दिनांक ०५/०५/२०२५ रोजी यातील आरोपी नामे विशाल दत्तात्रय तांदळे, वय २९ वर्षे, रा. मु. पो. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे यास अटक करण्यात आले होती. त्याचेकडून गुन्ह्यातील मारूती स्विप्ट डिझायर कार, सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५,०५,३६०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यात पाहिजे आरोपी समीर महादेव जाधव हा गुन्हा घडल्यापासून सुमारे २ महिन्यांपासून फरार होता. त्याअनुषंगाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे नमूद आरोपीचा ठावठिकाणा काढून दिनांक १७/०७/२०२५ रोजी मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे येथून ताब्यात घेवून त्यास दिनांक १८/०७/२०२५ रोजी अटक करून मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, डहाणु यांचे न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी मंजुर केलेली आहे.

आरोपी समीर महादेव जाधव याचा अभिलेख तपासला असता त्याचेविरूध्द यापूर्वी खून, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, शरीराविरुध्दचे गुन्हे, हत्यार बाळगणे असे एकूण १० गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, पालघर श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, पालघर श्री. विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग श्रीमती अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अजय गोरड, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस ठाणे, पोउपनि/अमोल चिंधे, पोना/५५८ महेश बोरसा, पोअं/१६० योगेश मुंढे सर्व नेमणुक तलासरी पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे. पुढील तपास हा पोउपनि/अमोल चिंधे, नेमणुक तलासरी पोलीस ठाणे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट