जबरी चोरी करणा-या आरोपीच्या येरवडा तपास पथकाने आवळल्या मुसक्या

0
Spread the love

पुणे

सह संपादक- रणजित मस्के

पुणे शहरामध्ये जबरीचोरी गुन्हयाचे अनुषंगाने मा. वरिष्ठांचे सुचना प्रमाणे हद्दीत पेट्रोलिंग करून जबरी चोरी गुन्हे उघडकीस आणणेच्या अनुषंगाने येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शेळके यांचे मार्गदर्शनाखाली दि.१७/०२/२०२५ रोजी तपास पथकाचे पोलीस अंमलदार विशाल निलख, अमोल गायकवाड असे हद्दीत पेट्रोलिंग करित असताना त्यांना बातमी मिळाली की, संगमवाडी रोडवरुन रात्रीचे वेळी येणारे जाणारे लोकांना लुटणारे संशयीत इसम संगमवाडीत थांबलेले आहेत.

सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे सव्हॅलन्स पथकाचे श्रेणी पोलीस उप-निरीक्षक प्रदिप सुर्वे व स्टाफ यांनी तेथे जावून संशयीत इसमांना पळून जात असताना अतिशय शिताफीने पकडले. त्यांचे नाव पत्ता विचारता १. आसिफ अजगर शेख, वय ३२ वर्षे, २. कुलदिपसिंग युवराजसिंग जुनी, वय २३ वर्षे, ३. मख्खनसिंग लाखनसिंग जुनी, वय ३२ वर्षे, सर्व रा. पाटील इस्टेट, शिवाजी नगर पुणे असल्याचे समजले. त्यांचेकडे सखोल चौकशी करता त्यांनी येरवडा भागामध्ये चोरी केल्याचे कबूल केले, सदरबाबत फिर्यादी यांच्या गळयातील चैन जबर दस्तीने हिसका मारुन चोरुन नेले बाबत येरवडा पो.स्टे.पुणे गु.र.नं.१३१/२०२५ मा.न्या.सं.क.३०९ (४),३ (५) अन्वये गुन्हा दाखल आहे. पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीकडून गुन्हयात वापरलेली १,००,०००/-रु.कि.ची अॅटो रिक्षा व गुन्हयातील चोरीस गेलेली ७५,०००/-रु.कि.ची सोन्याची चेन असा एकूण ०१,७५,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४. पुणे श्री. हिम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक गुन्हे, श्रीमती पल्लवी मेहेर, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती स्वाती खेडकर, सर्व्हेलन्सचे श्रेणी पोलीस उप-निरीक्षक प्रदिप सुर्वे, व तपास पथकाचे पोलीस अंमलदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, विशाल निलख, अमोल गायकवाड, प्रशांत कांबळे, बालाजी सोगे, नटराज सुतार, भीमराव कांबळे यांनी केलेली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट