जबरी चोरी करून पळून गेलेल्या चार अज्ञात आरोपींना जव्हार पोलीस ठाणे यांचेकडून अटक..!

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर.

दिनांक २८.०३.२०२५ रोजी रात्री २३.३० वाजताचे सुमारास फिर्यादी भोरू खंडू बिन्नर, वय ३० वर्षे, रा. खोडाळा, ता. मोखाडा, जि. पालघर, मुळ रा. मोडाव्ळे, पो. सांजेगाव, ता. इगतपुरी, जि. नाशिक हे त्यांचे पिकअप गाडीने जात असताना मौजे वावर गावचे हद्दित ता. जव्हार जि. पालघर येथे तीन अनोळखी इसम यांनी रस्त्यामध्ये मोटार सायकल आडवी उभी करुन ‘आमची गाडी बंद पडली आहे, आमची गाडी तुमच्या पिकअप गाडीमध्ये ठेवून पुढील गावात सोडुन द्या’ असे सांगत असताना पिकअप गाड़ी चालक व फिर्यादी यांचे डोळयामध्ये मिरचीपुड टाकुन पिकअप गाडीमध्ये ड्रायव्हर सिटच्या पाठीमागे असलेली ६,८५,५००/- रुपये रोख रक्कम फियांदी यांचे मानेवर कोयता ठेवुन फिर्यादीस जिये ठार मारण्याचा धाक दाखवुन बळजबरीने हिसकावुन नेल्याबाबत फिर्यादी यांचे फिर्यादीवरून जव्हार पोलीस ठाणे येथे । ८८/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी श्री. गणपत पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/किशोर नाननाय, जहार पोलीस ठाणे यांना पोलीस पथक तयार करून तपास करण्याबाबत सुचना दिल्या. त्याअनुषंगाने पोउपनि/संजय भुसाळ, पोउपनि /दिघोळे, पोहवा/८२४ प्रदिप विटकर, पोहवा/४६३ गायकवाड, पोहवा/नेहरे, पोना/५७० सचिन भुसारा सर्व नेम. जव्हार पोलीस ठाणे यांचे पथक तयार करण्यात आले. सदर पथकाने घटनास्थळी भेट दिली असता घटनास्थळी मिरची पुड मिळून आली. सदर मिरची पुड ही एका लग्न पत्रीकेत आणली असल्याचे दिसून आले. त्याआधारे तसेच तांत्रीक पध्दतीने तपास करून चार संशयीत आरोपी १) दत्तु खंडू बिन्नर वय ३४ वर्षे, रा. खोडाळा ता. मोखाडा जि. पालघर मुळ रा. मोडाळे, पो. साजेगाव, ता. इगतपुरी, जि. पालघर २) परमेश्वर कमलाकर झोले वय २४ वर्षे रा. थाडोशी, पो. गामुड्डी, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक ३) दादा बाजीराव पेहरे वय २४ वर्षे, रा. भिलनाळ, पो. सामुड्डी, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक, ४) किरण आनंता लामठे, वय २३ वर्षे, रा. भूरीटेक पैकी धांगडयाची वाडी, ता. मोखाडा, जि. पालघर यांचा शिताफिने शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे कसून चौकशी केली असता आरोपी क्र. १ हा

फिर्यादीचा भाऊ असून त्याने आरोपी क्र. २ ते ४ यांचे साथीने फिर्यादी यांना अडवून वरीलप्रमाणे जबरी चोरी करून ६,८५,५००/- रुपये रोख रक्कम पळवीली असल्याचे कबुल केले आहे. नगुव आरोपी यांना अटक करून वर नमूद रक्कम जप्त करण्यात आली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास हा पोउपनि/संजय भुसाळ, नेमणुक जव्हार पोलीस ठाणे हे करत आहेत.

सदरची कारवाई ही श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. गणपत पिगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/किशोर मानभाव, जव्हार पोलीस ठाणे, पोउपनि/संजय भुसाळ, पोउपनि/दिघोळे, पोहवा/८२४ प्रदिप विटकर, पोहवा/४६३ गायकवाड, पोहवा/नेहरे, पोना/५७० सचिन भुसारा सर्व नेम. जव्हार पोलीस ठाणे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट