जबरी चोरीच्या गुन्हयातील ३ आरोपी व एक विधीसंघर्षीत बालक मुद्देमालासह पुणे युनिट ३ च्या ताब्यात..

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

पुणे

दि.०१/०७/२०२५ रोजी गजानन ज्वेलर्स, रेणुकानगरी, वडगाव बु. पुणे या सराफ दुकानामध्ये अनोळखी चोरटयांनी प्रवेश करुन, दुकानदार महिला फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देश्याने त्यांच्या डोक्यात व डावे हाताचे दंडावर लोखंडी हत्याराने वार करून, त्यांना गंभीर जखमी करुन, दुकानाचे कपाटाचे काचा लोखंडी हत्याराने फोडुन, कपाटामधील किंमत रुपये ४,५०,०००/-रू.कि.चे ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरुन नेले व पळुन जातेवेळी त्यांचे हातामधील पिस्तोल व लोखंडी हत्यार हवेत फिरवत लोकांमध्ये दहशत निर्माण करीत निघुन गेले. सदर घटनेबाबत फिर्यादी यांचे फिर्यादीवरुन सिंहगड रोड पोलीस स्टेशन गु.रजि.नं. ३२९/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३११,३ (५), सह भारतीय हत्यार कायदा कलम ३.४ (२५) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) सह १३५ क्रिमीनल लॉ अमेंडमेन्ट कायदा कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनेनंतर तात्काळ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील युनिट १, २,३ तसेच खंडणी विरोधी पथक व दरोडा वाहन चोरी विरोधी पथक यांनी घटनास्थळास भेटी देवुन संमातर तपास सुरु केला. तपासा दरम्यान गुन्हे शाखा, युनिट ०३ व नांदेड सिटी डिबी पथक यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक करुन आरोपीतांची ओळख पटवुन आरोपी निष्पन्न करुन नमुद गुन्हयातील विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेतले. त्याच्याकडुन गुन्हयात वापरलेले वाहन शाईन कंपनीची मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे व त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये व गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हयातील पाहिजे आरोपी बाबत माहिती काढून गुन्हे शाखा युनिट ०३ चे पथक व सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पथक है अहमदनगर या ठिकाणी रवाना करुन गुन्हयातील उर्वरित ०३ आरोपी नामे १) वरदन संजय खरटमल वय २० वर्ष रा शांताईनगर पठार वस्ती, कुदळेचाळ, वडगाव बुा. पुणे २) अमर हनुमंत बाभळे वय २० वर्ष स आशाताई निवास समोर, उत्कर्ष शाळेच्या पाठीमागे, धबाडी, वडगाव बुा, पुणे ३) ओकांर रवि शिंदे वय २२ वर्ष रा. मानाजीनगर, विघ्नहर्ता हाईटस, प्लॅट नंबर २, न-हे, पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे सखोल चौकशी करुन नमुद गुन्हयातील चोरीस गेलेला खालिल वर्णनाचा मुद्देमाल त्यांचेकडुन हस्तगत करण्यात आलेला आहे.

१)१,३५,०००/- रुपये किमंतीची ०१ सोन्याची चैन वजन अंदाजे १५ ग्रॅम डिझाईन असलेली

२) ९०,०००/- रुपये किमंतीची ०१ सोन्याची चैन वजन अंदाजे १० ग्रॅम

३)१,३५,०००/- रुपये किमंतीची ०३ सोन्याची चैन प्रत्येकी वजन ०५ ग्रॅम

४) ९०,०००/- रुपये किमंतीची ०१ नेकलेस वजन अंदाजे १० ग्रॅम

असा एकुण ४,५०,०००/- रू.कि. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी ही, मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, (अति. कार्य. गुन्हे शाखा), पुणे शहर श्री. विवेक मासाळ, पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ ०३, पुणे शहर श्री. संभाजी कदम, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १ श्री. गणेश इंगळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर श्री. अजय परमार, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ३, चे पोलीस निरीक्षक श्री. भाऊसाहेब पाटील, खंडणी विरोधी पथक १ चे पोलीस निरीक्षक श्री. संखे, नांदेड सिटी पो स्टे, पोलीस निरीक्षक श्री. बोस, सिंहगड रोड पो स्टे, पोलीस निरीक्षक श्री. दायंगडे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, प्रविण काळुखे, सचिन यादव, पोलीस उप-निरीक्षक फरताडे, भांडवलकर, सपोफौ पंढरीनाथ शिंदे, पोलीस अंमलदार कैलास लिम्हण, किशोर शिंदे, अतुल साठे, तुपसौंदर, शनगारे, बोडरे, ताजणे, वेगरे, पुरषोत्तम गुन्ल्ला, तुषार किंद्रे, स्वप्निल मगर, कारके, मोहिते, झगडे, चव्हाण, माळवदकर, मोरे, क्षीरसागर यांचे पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट