जबरी चोरीचा बनाव करणा-या टोळीचा उमदी पोलीसांनी१६ तासात केला पडदाफाश..

सह संपादक -रणजित मस्के
सोलापूर


अपराध क्र आणि कलम
गुरनं १७४/२०२५ भारतीय न्यायसंहिता (चीएनएस) कलम ३०९ (४),३/५
गु.दा.ता वेळ
दिनांक ०२.०७.२०२५ रोजी २३.३५ वा
फिर्यादी नाव
अभिजित नारायण चाडकर, वय २५ वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा. कासार मळा, मंगळवेढा रोड, गोपाळपुर, ता. पंढरपुर, जि. सोलापुर, मो नं. ८३०८६०७३०२
माहिती कशी प्राप्त झाली
गुन्हयाच्या तपासा दरम्यान कौशल्याने उकल
गुन्हा उघड दि.०३.०७.२०२५ रोजी १५.३० वा सोळा तासाच्या आत
गेला माल
१२,७६,८००/- रुपये
मिळाला माल
१२७६,८००/- रुपये
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. पोलीस अधीक्षक श्री संदिप पुगे सो
मा. अपर अधीक्षक, श्रीमती कल्पना बारवकर
श्री विपुल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विटा, अतिरिक्त कार्यभार जत विभाग जत
यांचे मार्गदर्शानाखाली
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप कांबळे २) पोउनि बंडु साळवे ३) पोहेकों १९२८ संतोष माने
४) पोहेकॉ/११९५/आगतराय मासाळ, ५) पोशि/४५/ सोमनाथ पोटभरे ६) पोशि/७५२/महादेव मडसनाळ
अटक वेळ दिनांक
दिनांक ०५.०७.२०२५ रोजी
आरोपीचे नाव पत्ता
१) प्रमोद सुभाष शिंदे, वय-३२ वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा. चौगुले वरती, खडकी, ता. मंगळवेढा, जि. सोलापुर
२) सिध्देश्वर अशोक डांगे, वय २७ वर्षे, ड्रायव्हर, रा. खडतरे गल्ली, सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापुर
३) तौफिक समशेर मणेरी, वय ३५ वर्षे व्यवसाय ड्रायव्हर, रा. मणेरी मळा, जुना सावे रोड, सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापुरपाहिजे असलेला आरोपी अक्षय इंगोले, रा. सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापुर
गुन्हयाची थोडक्यात हकीकत :- दि.०२.०७.२०२५ रोजी रात्री ०९.३० वा ते १०.०० वा च्या सुमारास यातील आरोपी प्रमोद शिंदे व यातील फिर्यादी असे मंगळवेढा ते ताडपत्री आंद्रप्रदेश असे मंगळवेढा ते उमदी जाणारे रोडवरील आरटीओ चेकपोस्टच्या पुढे उमदी गावाच्या दिशेने जात असताना आरोपी प्रमोद शिंदे यास उलटी आल्याने गाडी थांबविली असता फिर्यादी च्या गाडीच्या मागे एक मारुती सुझुकी कंपनीची स्विफट गाडी येवुन थांबली त्यातुन तिन इसम उतरुन एकाने फिर्यादीच्या डोळयात स्प्रे मारुन व दोन इसमांनी प्रमोद शिंदे यास लाथा मारुन खाली पाडुन गाडी मध्ये असलेली काळया रंगाच्या सॅक मधील १२,७६,८००/- रुपये जबरीने चोरुन नेले आहेत म्हणुन वर नमुद प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान यातील आरोपी प्रमोद शिंदे यांचे कडे उमदी पोलीस ठाणे कडील अधिकारी व अमंलदार यांनी कसुन, कौशल्याने तपास करता त्यांने सदर गुन्हयात गेलेली रक्कम ही त्यास त्याचे मालक फारुख यांनी दिली होती. येवढी रक्कम बघुन त्यास हव्यास सुटल्याने त्यांने त्याचे मित्र सिध्देश्वर अशोक डांगे ऊर्फ दादा दांडगे, तौफिक समशेर मणेरी व अक्षय यांना घेवुन फिर्यादीत नमुद केले प्रमाणे चोरुन नेले असे दाखवायचे व ती रक्कम आपआपसात वाटुन घ्यायची असा कट करुन जबरी चोरी झाली असल्याचा बनाव केला असल्याचे दिसुन आले असुन यातील साक्षीदार व आरोपी यांचे कडुन गुन्हयात गेलेली रक्कम १२,७६,८००/- रुपये ही संपूर्ण व गुन्हयात वापरलेली गाडी स्विफट कार हस्तगत केली आहे. तसेच चार आरोपी पैकी तीन आरोपींना ताब्यात घेतले असुन एका आरोपीचा शोथ सुरु आहे. सदर गुन्हा घडल्यानंतर १६ तासाच्या आत उमदी पोलीसांनी गुन्हयाची उकल केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि श्री बंडु साळवे हे करीत आहेत.