जबर दुखापत करून दरोडा घालुन मागील 20 वर्षा पासून २ फरार आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया केेले जेरबंद…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :-आरोपी नामे -1) सूर्यभान व्‍यंकटी काळे वय 65 वर्षे 2) गणेश ऊर्फ गणपती उर्फ गणपत व्यंकटी काळे, वय 50 दोन्ही रा. केकतपांगरी तालुका – गेवराई जिल्हा- बीड अशी जेरबंद कऱण्यात आलेल्या पाहिजे आरोपीतांची नावे आहेत….दोघांनाही मुकुंदवाडी जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथून ताब्यात घेण्यात आले*

🎯 याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील फरार- पाहिजे आरोपीतांचा आढावा घेऊन स्थानिक गुन्हे शाखेस फरार पाहिजे आरोपीतांचा शोध घेऊन त्यांना गुन्ह्यात जेरबंद करून अटकेबाबत निर्देश सूचना दिलेल्या होत्या… या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे प्राप्त निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास जिल्ह्यातील फरार-पाहिजे आरोपीतांचा शोध घेवून अटक करण्याचे सूचना केल्याने स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाकडून जिल्ह्यातील फरार-पाहिजे आरोपींतांचे अटकेकरीता शोध मोहीम राबविण्यात येत आहे…

या अनुषंगाने स्थां. गु. शा. पोलीस पथक जिल्ह्यातील फरार-पाहिजे आरोपीतांचे सध्याचे वास्तव्याबाबत माहिती घेवून माहितीचे विश्लेषण करीत असताना.. तसेच गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त करीत असता पथकास खात्रीशिर माहिती प्राप्त झाली की, 15 ते 20 वर्षापासून पोलीस ठाणे ड्युग्गीपार येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील… पाहिजे व फरारी असलेले आरोपी नामे-1) सूर्यभान व्‍यंकटी काळे व 2 ) गणेश ऊर्फ गणपती उर्फ गणपत व्यंकटी काळे, दोन्ही रा. केकतपांगरी तालुका – गेवराई जिल्हा- बीड हे मागील 10 ते 15 वर्षापासून मुकुंदवाडी परिसरातील राजनगर, संभाजीनगर येथे राहत आहेत…. अश्या प्राप्त माहितीची छत्रपती संभाजीनगर काईम ब्रांच येथे संपर्क करुन खात्री केली असता सदर आरोपी हे मुकुंदवाडी राजनगर भागात राहत असल्याची खात्री झाल्याने सदर बाबत वरिष्ठांना कळविण्यात येवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संभाजी नगर येथे जावून क्राईम ब्रांच संभाजीनगर येथील पोलीस पथकाचे मदतीने दोन्ही आरोपीतांचा शोध घेवून ते त्यांचे सध्याचे वास्तव्य करीत असलेल्या घरी ह.मु. गेट न. 56 राजनगर, मुकुंदवाडी जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे मिळून आल्याने त्यांना दिनांक.. 2/4/2024 रोजी पहाटे ताब्यात घेण्यात आले…. विचारपूस चौकशी अंती दोघानाही पो.ठाणे डुगीपार येथील गुन्हया संबंधाने जेरबंद करण्यात आले आहे ….

जेरबंद कऱण्यात आलेल्या दोन्ही पाहिजे आरोपीतांनी सन 2004 मध्ये पोलीस ठाणे डूग्गीपार येथे जबर मारहाण दुखापत करून दरोडा घालून फरार झाले होते……

त्यांचे विरुद्ध पोलीस ठाणे डुगीपार येथे गुन्हा क्रमांक 92/2004 कलम 395, 397 भादवी अन्वये दाखल करण्यात आलेला असल्याने दोघांना पुढील कायदेशीर कारवाई करीता पो. ठाणे डूग्गीपार पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे…….

पुढील तपास कायदेशीर कारवाई डुग्गीपार पोलीस करीत आहेत

सदरची कामगीरी मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली पो. नि. स्था. गु. शा. श्री. दिनेश लबडे,यांचे नेतृत्वाखालील पथक पो. उप. नि. महेश विघ्ने, पोलीस अंमलदार पो.हवा. विठ्ठल ठाकरे, रियाज शेख, इंद्रजित बिसेन, पो. शि.संतोष केदार, चा.पो. हवा. लक्ष्मण बंजार यांनी कामगिरी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट