गांजा विक्रीकरीता घेवुन येणाऱ्या इसमावर पोलीस ठाणे छावणी ची कारवाई 94,000/- रु चा मुद्देमाल जप्त

उपसंपादक – रणजित मस्के
औरंगाबाद :-थोडक्यात हकीकत- दिनांक-06/06/2023 रोजी पोलीस उप निरीक्षक पुंडलिक डाके, पोलीस स्टेशन छावणी यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की सायंकाळी 19:00 वा च्या सुमारास जांभाळा येथून मोटार सायकलने एक इसम पडेगांव औरंगाबाद येथे गांजा (कॅनॅबीस वनस्पती) विक्री करण्यासाठी येणार आहे. सदरची माहीती पोउपनि डाके यांनी पोलीस निरीक्षक कैलास देशमाने पो.स्टे. छावणी यांना दिली. सदर माहीती वरीष्टांना देवुन त्याच्या आदेशान्वये पोलीस स्टेशन छावणी येथील अधिकारी व अंमलदार यांनी सदर इसमावर कारवाईसाठी रात्री 22:20 वाजता पडेगाव छावणी नाका याठिकाणी सापळा रचुन छापा मारला. छाप्यादरम्याण इसम नामे सरफराज खान अय्युब खान वय 42 वर्ष धंदा रेती व्यवसाय रा. 5-16-33 ए.बी.सी. नुतन कॉलनी, पैठण गेट रोड, औरंगाबाद याच्या ताब्यातुन 70,000/- रू किंमतीची हीरो एच.एफ. डीलक्स मो.सा. क्र. MH-20 GF-2366 व 24,000/- रू किंमतीचा 1.966 कि. ग्रॅ. वजनाचा गांजा असा एकुण 94,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोउपनि पुंडलिक डाके यांच्या फिर्यादीवरुन पो.स्टे. छावणी छत्रपती संभाजीनगन शहर येथे गुन्हा रजि नं. 235/2023 कलम- 20(b)(ii),8(C) NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस आयुक्त श्री. मनोज लोहिया छत्रपती संभाजीनगर, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ- 01 श्री. दिपक गिन्हे मा. सहायक पोलीस आयुक्त छावणी विभाग श्री अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छावणी पो.स्टे. श्री कैलास देशमाने, सहायक पोलीस निरीक्षक श्री. इ नेश्वर अवघड, श्री पांडुरंग भागिले, पोउपनि श्री पुंडलिक डाके, सफी/जोशी, पोना- सिध्दार्थ थोरात, नारायण पायघन, सुनिल धाञक, पो. अ. योगेश पाटील, सुमेध पवार, मंगेश शिंदे, कैलास सोरमारे, नंदु सुर्यवंशी पो.स्टे. छावणी छत्रपती संभाजीनगर शहर यांनी केली. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक कैलास देशमाने करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com