वेश्या व्यवसाय करणाऱ्या ईसमावर एम एच बी कॉलनी पोलीसांची पिटा कायद्यान्वये कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

मुंबई : – स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करणाऱ्या एकाला एम एच बी कॉलनी पोलिसांनी अटक केली आहे.

एम एच बी कॉलनी पोलीस ठानेचे पो ऊ नि डॉ दिपक हिंडे यांना गोपनीय बातमीदार यांचे कडून माहिती मिळाली की, एक इसम काही महिलांना बोलावुन घेवुन गरीब व असहाय महिलांचा गैरफायदा घेवुन त्यांना पैशाचे आमीष व आर्थिक लाभ मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवुन अनैतिक व्यापार करणेसाठी महिलांना बोलावुन घेवुन गि-हाईकांना महिला पुरवत असलेबाबत माहीती मिळालेने सदरची माहिती वपोनि सुधीर कुडाळकर यांना दिली असता त्यांनी तात्काळ मा सहाय्यक पोलीस आयुक्त , बोरीवली विभाग यांचेकडून परवानगी घेऊन पो नी मते, पो ऊ नी हिंडे, पो ऊ नि साळवे, पो ऊ नि जिरोनेकर, पो ह भारती, म पो शी पुजारी , म पो शी इलग यांना कारवाई करण्याचे आदेश दिले असता त्यांनी सदर ठिकाणी छापा कारवाई करुन कलम ४,५ पिटा कायदा १९५६ अन्वये १ पिडीत महिले ची सुटका केली. तसेच १ आरोपीना अटक केली. पिडीत महिलेस सुधारगृहात पाठवले आहे.

अटक करण्या आलेल्या आरोपीची नावे पुढील प्रमाणे,

१) अजय अमृतलाल ठक्कर, वय – ५८ वर्ष, व्यवसाय – नाही, रा. ठी. रूम नं ए/ १७, कैलास नगर, शंकर लेन, कांदिवली पश्चिम , मुंबई .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट