30 दिवसात 50 % वाढिव रक्कम देण्याचे आमिष दाखवून कोटयावधीचा गंडा घालणाऱ्या इसमांना उरण
पोलीसांकडुन सापळा रचून अटक…
उपसंपादक – रणजित मस्के
नवी मुंबई: सतिश विष्णु गावंड वय ३२ वर्षे रा. पिरकोन, ता. उरण, जि. रायगड हे लोकांकडून १ लाख रुपये किंवा कमी जास्त पैसे घेऊन सदरचे पैसे ५० दिवसाच्या ठेवीकरीता कोणत्यातरी ठिकाणी गुंतवितो व सदरचे पैसे हे ५० दिवसानंतर ४० टक्के दराने गुंतवणुकदारांना परत करत आहेत, अशा आशयाचा तक्रारी अर्ज प्राप्त झाला आहे.

सतिश गावंड यांचेविरुद्ध कोणीही गुंतवणुकदार तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याने मा. वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पिरकोन, भेंडखळ गावात ग्रामस्थांच्या बैठका घेऊन त्यांना अशा प्रलोभनास बळी न पडण्याचे व अशा प्रकारे गुंतवणुक केल्यास फसवणुक होईल याची माहिती देऊ कोणाची फसवणुक झाली असल्यास त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देण्याचे आवाहन केले होते. परंतू कोणीही गुंतवणुकदारांनी तक्रार केली नसल्याने ठिकठिकाणी महत्त्वाचे व सार्वजनिक ठिकाणी प्रसिध्दी पत्रके, बॅनर लावून नागरिकांना आवाहन करण्यात आले. तरी देखील कोणीही गुंतवणुकदार तक्रार देण्यासाठी आले नाहीत.
त्यानंतर मा. पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ २, पनवेल व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त सी, पोर्ट विभाग यांचे मार्गदर्शनाखाली उरण पोलीस समेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल पाटील यांचे नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुहास चव्हाण, सपोनि कैलास गवते, सपोनि प्रकाश पवार, सपोनि विजय पवार, पोहवा / ९४४ नितीन गायकवाड, पोहवा / ३५१८ बलदेवसिंह अधिकारी, पोहवा १७४४ शशिकांत घरत, पोहवा / २०१३ घनश्याम पाटील पोहवा / १७७६ कुणाल म्हात्रे, पोहवा / १९५० गणेश शिंपी, पोहवा / १९८२ भिमराज शिंदे, पोना / १५७६ मच्छिंद्र कोळी, पोना/ २३१६ महेंद्र म्हात्रे, पोना/ २८०६ अभिजीत दगडे, पोशि/ ३०४८ सचिन माळशिकारे असे विशेष पथक नेमण्यात आले.
दिनांक १७/०२/२०२३ रोजी पोनि सुनिल पाटील यांना पिरकोन, ता. उरण, जि. रायगड या ठीकाणी सुरू असलेल्या गैरप्रकाराच्या अनुषंगाने गैरव्यवहारातील रक्कम एका वाहनामध्ये भरून कोप्रोली, ता. उरण, जि. रायगड परिसरातून येणार असल्याची माहिती मिळाली. सदरची माहिती पोनि (गुन्हे) सुहास चव्हाण, सपोनि कैलास गवेत सपोनि विजय पवार, पोहवा / ९४४ गायकवाड, पोहवा / ३५१८ अधिकारी, पोहवा / १९८२ शिंदे, पोहवा / ६०८ गिते, पोहवा / ५६२ पाटील, पोहवा / २०१३ पाटील, पौना / २३१६ म्हात्रे, पोना / १४४४ आहेर असे शासकीय पंच व व्हिडीओग्राफर यांचेसह खाजगी वाहनाने गेले असताना वपोनि सुनिल पाटील यांना काळ्या पिवळ्या मारूती इको गाडीतून गैरव्यवहारातील रक्कम रिलायन्स रोडने खोपटा चौकातून कोप्रोलीकडे घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे रिलायन्स रोडवर खोपटा चौकाजवळ वरील पोलीस पथक सापळा लावून थांबलेले असताना दिनांक १७/०२/२०२३ रोजी २२.०० वा. चे सुमारास रिलायन्स रोडने एक काळी पिवळी संशयीत इको गाडी येताना दिसली. सदरची गाडी रस्त्याचे बाजुला थांबवून घेऊन गाडी चालकाची व त्यामध्ये बसलेल्या इसमाकडे विचारपुस केली असता त्यांनी चालकाने त्याचे नाव शशिकांत अनंत गावंड वय ३४ वर्षे, रा. पिरकोन, ता. उरण, ,जि. रायगड असे सांगून त्याचे बाजुस बसलेल्या इसमाने नाव सतिश विष्णु गावंड वय ३२ वर्षे रा.पिरकोन, ता. उरण, जि. रायगड असे सांगितले. गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये १० ट्रॅव्हल्स ट्रॉली बॅग दिसून आल्याने त्या बॅगची दोन पंचासमक्ष व व्हिडीओ शुटिंग करून तपासणी केली असता त्या बॅगमध्ये मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम असल्याचे दिसून आल्याने त्यांना पंचासह पोलीस ठाण्यात आणले.
पोलीस ठाण्यात आणल्यानंतर वरील इसमांचे ताब्यात मिळून आलेल्या बॅगांची पाहणी केली असता त्या बॅगांमध्ये एकुण रुपये ९,९९,७४,५००/- रोख रक्कम मिळून आली. सदर रक्कमेबाबत सदर इसमांनी मालकी हक्क शाबीत न करू शकल्याने व उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांचेविरुद्ध सीआरपीसी कलम ४१ (१) (डी) अन्वये तक्रार दाखल केली आहे.
त्यानंतर सतिश गावंड यांचेकडे गुंतवणुक करून फसवणुक झालेल्या लोकांची माहिती घेत असताना तक्रारदार नामे सौ. कविता महेश कोळी, वय ४२ वर्षे, व्यवसाय खानावळ, रा. मोरागाव, दत्त मंदिराजवळ, ता. उरण, जि. रायगड यांनी पोलीस ठाणेत येऊन सतिश गावंड यांचेकडे त्यांनी दिनांक १९ / ०१ / २०२३ रोजी १,६५,०००/- रूपयाची गुंतवणुक केली होती. त्यावेळी सतिश गावंड याने त्यांना त्यांनी गुंतवणुक केलेल्या रक्कमा अधिक परतावा म्हणून दिनांक १७/०२/२०२३ रोजी २,५०,००० /- रुपये देणार असल्याचे सांगितले होते. परंतू प्रत्यक्षात तक्रारदार या दिनांक १७/०२ / २०२३ रोजी सतिश गावंड यांचेकडे त्यांनी गुंतवलेल्या रक्कमेची वाढीव रक्कम घेण्यास गेल्या असता त्यांना सतिश गावंड यांनी रक्कम न देता त्यांची फसवणुक केली असल्याने त्यांनी उरण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सतिश विष्णु गावंड व शशिकांत अनंत गावंड यांचेविरुद्ध गुन्हा रजि. क्र. ४१ / २०२३ भादंवि कलम भादंवि कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ सह प्राईज चिटस् अॅण्ड मनी सेर्क्युलेशन स्किम (बेंनिंग) अॅक्ट १९७८ चे कलम ३, १४,५५ सह बैनिंग ऑफ अनरेगुलेटेड डिपॉझिट स्किम अॅक्ट २०१९ कलम ३, ४, ५, ६, २१, २२, २३, २४, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात पोलीसांना मिळालेल्या माहिती वरून यातील आरोपी हा ३० ते ५० दिवसात ५० % परतावा देण्याचे आमीष दाखवुन लोकांकडुन गुंतवणुक स्विकारत असल्याचे माहिती मिळाल्यावरुन पोलीसांनी स्वत:हून सापळा रचुन सदर कारवाई केली आहे. सदर गुन्हयात मा. न्यायालयाने आरोपीतांना ५ दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com