नालासोपारा-मोरेगाव येथील ‘इशान विहार`ला अखेर नळजोडणी मिळाली..!

0
Spread the love

प्रतिनिधी- मनोहर आगोंडे

नालासोपारा :-शेकडो माता-भगिनींना आनंदाश्रू अनावर

जिल्हाप्रमुख पंकज देशुमख व माजी नगरसेवक किशोर पाटील यांचे मानले आभार

नालासोपारा-मोरेगाव येथील इशान विहार अपार्टमेंट या रहिवासी इमारतीला अखेर नळजोडणी मिळाली आहे. रविवार, 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजता या नवीन नळजोडणीचा उद्घाटन शुभारंभ झाला. या प्रसंगी या रहिवासी इमारतीतील शेकडो माता-भगिनींना आनंदाश्रू अनावर झाले.

त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धन्यवाद मानले. शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज देशुमख व माजी नगरसेवक तथा शिवसेना सचिव किशोर नाना पाटील शहरातील पाण्यापासून वंचित रहिवाशी सोसायटींना वसई-विरार महापालिकेच्या माध्यमातून नळजोडणी दिल्या जाव्यात, यासाठी मागील दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू ठेवले होते. या प्रयत्नांचा भाग म्हणून अखेर पालिकेने इशान विहार अपार्टमेंटला जलजोडणी वितरित केली आहे. त्यामुळे एकविरा अपार्टमेंट, इशान विहार अपार्टमेंट आणि दत्ताकृपा वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज देशुमख व माजी नगरसेवक तथा शिवसेना सचिव किशोर नाना पाटील आणि अन्य सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

वसई-विरार महापालिकेची लोकसंख्या 24 लाखांच्या आसपास आहे. शहरात पाण्याची वाढती मागणी असून, महापालिकेच्या नऊही प्रभागांत एकूण 60,796 नळजोडणी अस्तित्वात आहेत. यात 59,077 इतक्या रहिवासी, तर 1719 वाणिज्य/संस्था नळजोडणी आहेत. वाढीव पाणी उपलब्ध झाल्याने नवीन नळ जोडणी मंजुरीच्या प्रतीक्षेत वसई-विरारकर होते. वसई-विरार महापालिकेच्या नऊ प्रभागांत नळ जोडणीकरताचे तब्बल 5016 इतके अर्ज प्रलंबित आहेत. प्रतीक्षा यादीतील अर्जांची संख्या ही 1590 इतकी असून, या माध्यमातून 12,199 इतक्या नळजोडण्या दिल्या जाणार आहेत. मार्च 2020 पासून नळजोडणी मंजुरीच्या प्रतीक्षेत होत्या.

पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याबाबतची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सातत्याने प्रयत्नशील होता. शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज देशुमख यांनी याबाबत पालिका स्तरावर अनेकदा पत्रव्यवहारही केलेला होता. प्रसंगी वसई-विरारकरांच्या पाणीप्रश्नाकरता शिवसेनेच्या वतीने आंदोलनेही करण्यात आलेली होती. या प्रयत्नांचे आणि संघर्षाचे फलित म्हणून वसई-विरार महापालिकेकडून नळजोडणी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे, अशी माहिती एकविरा अपार्टमेंट, इशान विहार अपार्टमेंट आणि दत्ताकृपा वेल्फेअर सोसायटीतील रहिवाशांनी दिली. दरम्यान; या नळजोडणी उदघाटन समारंभाला शाखाप्रमुख अनिल संकपाळ, दीपक नारकर, रमेश आरडे , उपशाखा प्रमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट