ठाणे शहराच्या पोलीस आयुक्तपदी ओतुर गावचे सुपुत्र आयपीएस अधिकारी श्री. आशुतोष डुंबरे यांची नियुक्ती…

0
Spread the love

संपादक- दिप्ती भोगल

मुंबई :- सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी जुन्नर तालुक्यात उतुर गावचे सन्मानिय सुपुत्र श्री. आशुतोष डुंबरे यांची ठाणे शहराच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या या वर्षी झालेल्या 30 अधिकारी यांच्या पदोन्नती मध्ये पुणे जिल्ह्य़ातील आणि जुन्नर तालुक्यात पहिले आयपीएस अधिकारी श्री. आशुतोष डुंबरे यांची ठाणे शहराच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांची मितभाषी आणि स्पष्टवक्ता अशी ओळख आहे.

श्री. आशुतोष डुंबरे यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयात सह आयुक्त पदी , मुंबई क्राईम ब्रँचच्या सह आयुक्त पदी तसेच लाचलुचपत प्रतिबंधक महासंचालक पदी यापुर्वी अति उल्लेखनीय काम केले असून आपल्या खात्यांतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवून आपला वेगळा ठसा उमटविला आहे.

श्री आशुतोष डुंबरे यांचा जन्म 3 ऑगस्ट रोजी झाला असुन ते 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अशा या पोलीसांची प्रतिमा उंचावणाऱ्या कर्तव्यनिष्ठ अधिकारी यांना सुरक्षा पोलीस टाइम्सचा मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *