घरफोडी चोरी करणारी आंतरराज्य टोळी सांगली पोलीसांकडून जेरबंद दोन गुन्हे उघड, ५.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
Spread the love

पोलीस स्टेशन

सांगली शहर

गु.घ.ता वेळदि. २८/१२/२०२४ रोजीचे २०.०० ते दि. २९/१२/२०२४ रोजीचे ०९.०० च्या दरम्यानअपराध क्र आणि कलम६१५/२०२४ बी.एन.एस. कलम ३०५ अ. ३३१(३).३३१ (४)गु.दा.ता वेळ३१/१२/२०२४ रोजी १२.५६ वाफिर्यादी नावरफिक कादर कच्ची, रा गणपती पेठ, सांगली, मुळ रा उपलेटा, राज्य गुजरातमाहिती कशी प्राप्त झालीपोहवा / दरीबा बंडगर पोहवा / अनिल कोळेकर पोकों/विक्रम खोतकारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदारमा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शानाखालीपोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार,पोहेकॉ । महादेव नागणे, सागर लवटे, अनिल कोळेकर, द-याप्पा बंडगर, सागर टिंगरे, संदिप गुरव, सतिश माने, मच्छिंद्र बर्डे, नागेश खरात, उदय माळी पोना / संदिप नलावडे, पोशि / सोमनाथ पतंगे, पोशि/विक्रम खोतपोशि / कॅप्टन गुंडवाडे सायबर पोलीस ठाणेअटक दिनांक दि.०३/०१/२०२४ रोजीआरोपीचे नांव पत्ता१. सुहेल ए जे लियाकत अली, वय २५ वर्षे, रा राजाजी नगर होस्पेट जि बेल्लारी, राज्य कर्नाटक२. एस डी इरफान अली एस दादापीर, वय २१ वर्षे, रा पुलबंद स्कूल जवळ होस्पेट, जि बेल्लारी, राज्य कर्नाटक३. बी के मोहमंद तय्यब रेहमानवली, वय २१ वर्षे, रा बेल्लारी रोड सर्कस जवळ उराम्मा बेलु होस्पेट बेल्लारी, राज्य कर्नाटकउघडकीस आलेले गुन्हे१. सांगली शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ६१५/२०२४ बी.एन.एस कलम ३०५. ३३१ (४), ३३१ (४) प्रमाणे २. विश्रामबाग पोलीस ठाणे गु.र.नं. ४७२/२०२४ बी. एन. एस कलम ३०२ (२) प्रमाणेजप्त मुद्देमाल१) ५,००,९००/- रू. रोख रक्कम२) ६०,०००/-रू. एक सुझुकी अॅक्सेस मोटार दुचाकी जु. वा. किं. ओ.३) ५०/- रू. एक लोखंडी कटावणी अंदाजे ७ इंच लांबीची जु. या. कि. अं.४) ५० /- रू. एक काळ्या रंगाची सॅक जु. वा. किं. अं.५,६६,०००/-रू. एकूणगुन्हयाची थोडक्यात हकीकतमा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन घरफोडी व मोटार सायकल चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.त्या अनुशंगाने दि. ०३/०१/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोका विक्रम खोत यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, तानंग फाटा चौक परिसरामध्ये एक काळे रंगाची सुझुकी अॅक्सेस गाडी वरून तीन इसम संशयितरित्या फिरत आहेत.नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जावून सापळा रचून थांबले असता त्यांना एक काळे रंगाची मोपेड अॅक्सेस दुचाकी वरून तीन इसम येत असल्याचे दिसले. त्यांचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदरची गाडी थांबवून सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नाव गाय विचारता त्यांनी त्यांची नावे १. सुहेल ए जे लियाकत अली, वय २५ वर्षे, रा राजाजी नगर होस्पेट जि बेल्लारी, राज्य कर्नाटक २. एस डी इरफान अली एस दादापीर, वय २१ वर्षे, रा पुलबंद स्कूल जवळ होस्पेट, जि बेल्लारी, राज्य कर्नाटक ३. बी के मोहमंद तय्यब रेहमानवली, वय २१ वर्ष, रा बेल्लारी रोड, सर्कस जवळ, उराम्मा बेलु, होस्पेट, बेल्लारी, राज्य कर्नाटक अशी सांगितली. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, बी के मोहमंद तय्यब याचे पाठीवर असलेल्या सॅकमध्ये वरीलप्रमाणे रोख रक्कम व लोखंडी कटावणी मिळून आली. त्यास सदर रोख रक्कम व मोटार सायकलीबाबत विचारणा केली असता त्याने सदरची रोख रक्कम सांगली येथील गणपती मंदिरासमोरील पेठेमध्ये एका बंद दुकानाचे कुलूप तोडून आत जावून कपाटातून चोरी केलेचे व मोटार सायकल ही विजयनगर चौक, सांगली येथुन चोरी केलेबाबत कबुली दिली.सदर बाबत सांगली शहर व विश्रामबाग पोलीस ठाणेचे क्राईम अभिलेख तपासले असता वरीलप्रमाणे घरफोडी व मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्यांचे कब्जातील रोख रक्कम, गुन्हयात वापरलेली मोटार सायकल व इतर साहित्य पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केले आहेत. सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी असुन त्यांचेवर मोटार सायकल चोरी व घरफोडीचे कर्नाटक राज्यात गुन्हे नोंद आहेत.सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी सांगली शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट