घरफोडी करणाऱ्या, आंतरराज्य सराईत चोरांच्या टोळीस कस्तुरबा पोलीसांनी केले जेरबंद…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

बोरीवली :-कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे यांच्या ह‌द्दीमध्ये टाटा पॉवर, बोरीवली पूर्व, मुंबई परिसरातील एका इमारतीमध्ये राहणारे फोटोग्राफर इसम दिनांक १३/०८/२०२४ रोजी सकाळी ते कामावर गेल्यानंतर सायंकाळी घरी परत आले असता त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या घरातील ASUS कंपनीचा लॅपटॉप मॉडेल K513EA Notebook PC सिरीअल क. N1N0CV12R485020 अंकिं. ३०,०००/- रू चोरी केल्याबाबत तक्रार दिल्यावरून गु.र.क्र. ५८५/२०२४, कलम ३०५(अ), ३३१(३), BNS अन्वये तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाबाबत माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि धिरज वायकोस, पोउनि विजयेंद्र आंबवडे व गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी भेट देउन सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यामध्ये काही संशयित इसम एका ऑटो रिक्षाने येऊन फिर्यादीच्या इमारतीमध्ये जाऊन व काही वेळातच बाहेर पडून रिक्षाने निघून जाताना दिसले. त्यानंतर आणखी CCTV कॅमेरे तपासून रिक्षाचा नंबर प्राप्त करुन ओशिवरा, मुंबई येथील रिक्षासंबंधीत साक्षीदारांना बोलावून त्यांच्याकडे चौकशी केली असता समजले की, उत्तर प्रदेश येथील बीजनोर जिल्हयातील काही इसम ५ ते ६ दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आले असून त्यांनी रिक्षा वापरण्यासाठी घेतली होती असे सांगितले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता समजले की, सदरचे इसम हे एका दिल्ली आरटीओ पासींग असणाऱ्या ग्रे कलरच्या हुंडाई वेरणा कारने उत्तर प्रदेशकडे रवाना झाले आहेत तांत्रीक तपासावरून सदरचे इसम हे विक्रमगड-जव्हार मोखाडा (जिल्हा पालघर) या मागनि जात असल्याचे दिसून आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ सदर दिशेने गुन्हे प्रकटीकरण पथक रवाना करण्यात आले आणि मोखाडा पोलीस ठाणे यांच्या मदतीने वेरणा कार मधील पाच आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपींना पोलीस ठाण्यास आणून त्यांच्याकडे तपास केला असता त्यांचा नमुद गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली.

आरोपीकडून करतुरबा मार्ग पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हयातील लॅपटॉपसह सोने-चांदीचे इतर दागीनेदेखील हस्तगत करण्यात आले. आरोपींकडे केलेल्या तपासावरून त्यांनी सदरची मालमत्ता ही घाटकोपर परिसरातील पंतनगर पोलीस ठाण्याच्या ह‌द्दीतून चोरी केली असल्याचे सांगितले. सदरबाबत पंतनगर पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. ६४३/२४ कलम ३३१(२), ३३१(३) मधील मालमत्ता असल्याचे समजले, त्यामुळे सदरचा गुन्हादेखील उपड झाला आहे. तसेच आरोपीतांकडे केलेल्या अधिक तपासावरून कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे येथे दाखल गु.र. क्र. ५५८/२४ कलम ३०५ (अ), ३३१(२), ३३९(३) भान्यास यामध्येदेखील आरोपीतांचा सहभाग निष्पन्न झाल्याने सदरचा गुन्हादेखील उघडकीस आला आहे.

अटक आरोपी नावे-

१) एजाज रमजानी अन्सारी वय ३८ वर्षे २) अमीर सोहेल शमीम अहमद वय २८ वर्षे

३) सलमान तस्लीम नदाफ वय २८ वर्षे, ४) शकील इनामुल हक वय ४६ वर्षे

५) शादाब अकबर हुसेन वय २५ वर्षे

(मुंबई, गुजरात, दिल्ली येथे १४ गुन्हे) (मुंबई, गुजरात येथे ०४ गुन्हे)

सर्वजण रा.ठि. बीजनोर, उत्तर प्रदेश.
उघडकीस आलेले गुन्हे-

१) कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे गु.र.क्र. ५८५/२४ कलम ३०५(), ३३१(३) भाल्या.सं २) पंतनगर गु.र.क्र. ६४३/२४ कलम ३३९(२), ३३१(३) भा.न्या.सं

३) कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे गु.र.क्र. ५५८/२४ कलम ३०५(अ), ३३१(२),

३३१(३) भा.न्या.सं

आरोपीतांकडून चोरीस गेलेला मुद्देमाल, गुन्हा करण्यासाठी वापरलेली हत्यारे तसेच वाहने अशी पुढीलप्रमाणे मालमत्ता ताब्यात घेण्यात आली आहे.

१) ७,४५,०००/- रूपयांचे सोन्या चांदीचे दागीने

२) एक हयुडाई वेरणा कार क्र DL 08 CAF 6045 अं.कि. ३,५०,०००/-रु

३) एक बजाज रिक्षा क्र MH 02 EQ 4789 अं.कि. ७५,०००/- रू

४) दोन लोखंडी कटावणी, दोन लोखंडी स्क्रू ड्राइव्हर, एक लॉखडी स्क्रू पाना.

दोन लोखंडी काणस

एकूण किंमतः ११,१७,०००/-

अशा प्रकारे कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे, मुंबई येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाने घरफोडी करून चोरी करणे यासारख्या गंभीर गुन्हयात जलद गतीने हालचाल करून, कौशल्यपुर्वक

तपास करून, अटक आरोपीतांकडुन बोरी केलेली संपुर्ण मालमत्ता हस्तगत केलेली आहे. तसेच पंतनगर पोलीस ठाणे, मुंबई यांच्याकडील गुन्हयातील मालमत्तादेखील हस्तगत करुन सर्वोत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.

सदरची कामगिरी ही श्री राजीव जैन मा. अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशीक विभाग, मुंबई, श्रीमती स्मिता पाटील पोलीस उप आयुक्त, शोन १२ मुंबई, श्री किशोर गायके सहायक पोलीस आयुक्त, दहिसर विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेश नंदीमठ कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली

पोनि मनोज चाळके (गुन्हे), पोनि सचिन गवस, पोनि विजय पांचाळ, पोनि ऋषी इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउनि धिरज वायकोस, पोउनि विजयेंद्र आंबवडे, पोह ९६०२०६/राजेश पेडणेकर, पोह ०३२१८/मनोज परीट, पो.शि. ०८१००/ गणेश पाटील, पोशि. १३०२१५/राहूल सांगळे, पो. शि. १४००२०/विकेश शिगटे, पो.शि. १४०१८६/तुषार पुजारी, पो.शि.११०९३२/महेंद्र महाले, पो.शि. १४०४५४/अमोल फोपसे, पो.शि. १४२५४६/अनिकेत सकपाळ, पोशि ०९२९४७/संजय भोये यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट