नवजात बालकांची विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाशडॉक्टरसह ६ एजंटना अटक २ बालकांची सुटका…

उपसंपादक- रणजित मस्के
मुंबई :– नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. ही कारवाई मुंबई पोलील दलाच्या गुन्हे प्रकटीकरण कक्ष २ च्या पथकाने केली. वंदना अमित पवार ( वय २८ वर्षे), शितल गणेश वारे (वय-४१ वर्षे), स्नेहा युवराज सुर्यवंशी (वय-२४ वर्षे), नसीमा हनीफ खान, (वय-२८ वर्षे), लता नानाभाऊ सुरवाडे (वय-३६ वर्षे), शरद मारूती देवर (वय-४५ वर्षे), डॉ. संजय सोपानराव खंदारे (वय-४२ वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी नवजात बालकांची तेलंगणा, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रात लहान मुलांची विक्री केल्याचे निष्पन्न झाले असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे.
मुंबई गुन्हे शाखा, कक्ष-२ ला गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, कन्नमवार नगर परिसर, विक्रोळी (पूर्व) येथून कांता पेडणेकर यांच्या ५ महिन्यांच्या बाळाला शितल वारे हिने विक्री केली आहे. सदर माहितीच्या आधरे शितल वारेचा शोध घेतला असता ती गोवंडी परिसरात मिळाल्याने तिच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत तिने कांता पेडणेकर यांच्या ०५ महिन्याच्या बाळाची विक्री डॉ. संजय सोपानराव खंदारे (बी.एच.एम.एस) व वंदना अमित पवार यांच्यामार्फत संजय गणपत पवार आणि सविता संजय पवार यांना २ लाख रुपयांमध्ये विकल्याची कबुली दिली. त्यावरुन डॉ. संजय खंदारे व वंदना यांना ताब्यात घेवून विक्री केलेल्या ५ महिन्याच्या बाळाचा शोध घेण्यासाठी कक्ष-२ चे पथक रत्नागिरी जिल्हयात गेले असता वरील विक्री केलेले बाळ हे गुहागर, रत्नागिरी येथील संजय गणपत पवार आणि सविता संजय पवार यांचे ताब्यात मिळनू आले.
या प्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात (गु.नों.क्र. २०६/२०२४, कलम ३७०, ३४ भादंवि सह ७५, ८१,८३ अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ अन्वये) गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास कक्ष-२, कडे वर्ग करण्यात आला.
सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान शितल वारे हिने तिचे एजंट साथीदार शरद मारूती देवर व स्नेहा युवराज सुर्यवंशी यांचे मदतीने ०२ वर्षाची मुलगी २,५०,०००/- रुपया मध्ये विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर विक्री केलेल्या ०२ वर्षाच्या मुलीचा शोध घेतला असता सदरची मुलगी लिलेंद्र देजू शेट्टी यांचे ताब्यात मिळून आली. सदरच्या विक्री केलेल्या दोन्ही बालकांची सुटका करुन अवैधरित्या स्वतःचे आर्थिक फायदयासाठी विक्री केल्याचे दिसून आल्याने सदर बालकांना बाल आशा ट्रस्ट, महालक्ष्मी येथे काळजी व सुरक्षेच्या दृष्टीने ठेवण्यात आले आहे.
आरोपी हे फर्टीलीटी एजंट म्हणून काम करीत असताना त्यांचा विविध दवाखान्याशी संपर्क येत असल्याने सदरचे एजंट आर्थिक परिस्थिती खालावलेल्या कुटुंबाची माहिती घेवून त्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे नवजात बालकांची विक्री स्वतःचे आर्थिक फायदयासाठी सदरची आंतरराज्यीय टोळी महाराष्ट्र, तेलगंणा व आंध्रपदेश राज्यात सक्रिय असल्याचे तपासात दिसून आले.
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना, पोलीस उप आयुक्त (अंमलबजावणी) श्रीमती रागासुधा, पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डी-दक्षिण, दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-२ चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. दिलीप तेजनकर, म.पो. नि. श्रीमती भोर (कक्ष-५), स. पो.नि. श्री. दिनेश शेलार, म.पो.उप.नि. श्रीमती शितल पाटील, पो.उप.नि., श्री. संजय भावे, स.फौ. निंबाळकर, पो.ह. जगदाळे, पो.ह. राणे, म.पो.ह. तांबे, पो.ह. साळुंखे, पो.ह. पाडवी, पो.ह. थिटमे, पो.ह. कांबळे, पो.शि. हरड, म.पो.शि. शिंदे, पो.शि. सपकाळ, पो.शि. सय्यद, पो.शि. आव्हाड, सफौचा घाटोळ व पोशिचा पाटील यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com