इंस्टाग्राम सोशल मिडीया साईटवर तलवारीचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यास स्था. गुन्हे शाखा जालना यांनी केले जेरबंद..

जालना


सह संपादक -रणजित मस्के
जालना जिल्हयात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेऊन कारवाई करणेबाबत मा. पोलीस अधोक्षक श्री. अजयकुमार बंन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव व पथकास सुचना दिल्या होत्या.
त्यावरुन मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बन्सल यांचे मार्गदर्शनाखाली श्री. पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे पथक तयार करुन कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने दिनांक 09/07/2025 रोजी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे संभाजी सुभाष जन्हाड, वय-32 वर्ष, रा. काटखेडा, ता. अंबड जि.जालना याने इंस्टाग्राम सोशल मिडीया साईटवर एक तलवारीसह व्हिडीओ तयार करुन व्हायरल करुन लोकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. त्यानुषंगाने इसम नामे संभाजी सुभाष जन्हाड, वय-32 वर्ष, रा. काटखेडा, ता. अंबड जि. जालना यास काटखेडा ता. अंबड जि. जालना येथुन ताब्यात घेवुन त्याकडे तलवारीच्या अनुषंगाने विचारणा करता त्याने सदरची तलवार त्याचा मित्र नामे विशाल बाबासाहेब धोंगडे, वय-23 वर्ष, रा.चौधरीनगर, ता.जि. जालना मुळगांव- भिलपुरी, ता.जि. जालना याकडुन आणुन व्हिडीओ तयार केला व त्यास परत केल्याचे सांगितले. त्यानुसार इसम नामे विशाल धोंगडे यास चौधरीनगर ता.जि. जालना येथुन ताब्यात घेवुन त्याकडे तलवारीबाबत विचारणा करता त्याने तलवार काढुन दिल्याने ती तपासकामी जप्त करुन दोन्होहो आरोपीतांविरुध्द सरकारतर्फ फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाणे, जालना येथे कलम 4,25 भा.ह.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बन्सल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना श्री. अनंत कुलकणी यांचे मार्गदर्शनाखालो स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, पोउपनि श्री राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सागर बाविस्कर, देविदास भोजने, इरशाद पटेल, संदीप चिंचोले, सतिष श्रीवास, भागवत खरात, अशोक जाधवर सर्व स्था.गु.शा. जालना यांनी केली आहे.