आंतरवाली टेंभी येथील शेतकरी महिलेचा खुन करणाऱ्या विधीसंघर्षग्रस्त बालकास स्था. गुन्हे शाखा व तिर्थपुरी पोलीसनी घेतले ताब्यात..

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

जालना :

दिनांक 25/03/2025 रोजी आंतरवाली टेंभी येथे महिला नामे मिराबाई ऊर्फ संध्या राजाभाऊ बोंडारे वय-41 वर्ष रा. आंतरवाली टेंभी, ता. घनसावंगी जि. जालना हिला तिच्या शेतामध्ये तिच्या डोक्यात दगड टाकुन खुन करण्यात आला होता त्यामुळे मयताचा भाऊ फिर्यादी अंकुश सदाशिव औटे, वय-42 वर्ष, रा.आपेगांव ता.पैठण जि. छत्रपती संभाजीनगर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द तिर्थपुरी पोलीस ठाणे येथे गु.र.क्र.42/2025 कलम 103(1) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा शोध घेत असतांना गुप्तबातमीदार व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे एका 13 वर्ष 06 महिने वयाच्या विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली देवून सांगितले की, विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या शेतात जाणारे पाटाचे पाणी वांरवार अडवणुक करणे व विधीसंघर्षग्रस्त बालकाचा मोबाईल मयत महिलेने पाण्यात टाकुन खराब केल्याचा राग मनात धरुन दिनांक 25/03/2025 रोजी दुपारी 15:00 वाजेच्या सुमारास विधीसंघर्षग्रस्त बालकाने मयत महिला दुपारच्या वेळी तिच्या शेतामध्येझोपलेली असतांना तिच्या डोक्यात दगडटाकुन जिवे ठार मारले.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बन्सल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल खांबेयांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, तिर्थपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री. साजिद अहेमद, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. श्री. योगेश उबाळे, पोउपनि श्री. राजेंद्र वाघ, मपोउपनि, प्रतिभा पठाडे, तिर्थपुरी पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार नारायण माळी व स्था.गु.शा.चे पोलीस अंमलदार प्रभाकर वाघ, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, सतीष श्रीवास, आक्रूर धांडगे, इर्शाद पटेल, कैलास चेके, रमेश काळे, सौरभ मुळे सर्व स्थागुशा व तिर्थपुरी पोलीस ठाणेचे होमगार्ड धनंजय पवार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *