अंमली पदार्थाची विक्री व वाहतुक करणाऱ्या दोन आरोपीस पालघर पोलीसांकडून अटक..!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर.

तलासरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक २०/०७/२०२५ रोजी पोउपनि/विकारा दरगुडे, सफौ/हिरामण खोटरे व पोअं/कमलेश वरखंडे असे अवैध धंधावर कारवाई करण्याचे अनुषंगाने पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की दोन इसम अवैधरित्या गांजा या अंमली पदार्थाची खरेदी-विक्री करण्याच्या उद्देशाने तलासरी इभाडपाडा येथील तास्कंद हॉटेलजवळ येणार आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे नमूद ठिकाणी जावुन सापळा रचून छापा टाकला असता दोन इसम १) संतोश दुर्योधन स्वाईन, वय ३८ वर्षे, रा. तलासरी सुतारपाडा, शिव मंदिराजवळ, ता. तलासरी, जि. पालघर. २) बापटीस्ट नवसु धोडी, वय २४ वर्षे, रा. खेरडी खाडीपाडा, दादरा नगर हवेली यांना ताब्यात घेवून झडती घेतली असता त्यांच्याकडून २.३३० किलोग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ तसेच रोख रक्कम, दोन मोबाईल व दोन मोटारसायकल असा एकूण ३,९४,१६०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात येवून तलासरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १३०/२०२५, एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २० (ब), (ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद आरोपीस अटक करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढिल तपास हा पोउपनि/अमोल चिंधे, नेनणुक तलासरी पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्रीमती अंकिता कणरों, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अजय गोरड, तलासरी पोलीस ठाणे, सपोनि/हेमंत देवरे, पोउपनि/विकास दरगुडे, पोउपनि/जयरान उमतोल, पोउपनि/अनिल गोंजारी, सफी/ हिरामण खोटरे, पोहवा/०६ गणेश थोडी, पोअं/ कमलेश वरखंडे, पोअं/इंद्रभान लंबे सर्व नेमणुक तलासरी पोलीस ठाणे यांनी केलेली आहे.